Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण, मुंबईतले दर 450 रुपयांनी गडगडले; जाणून घ्या आजचे भाव

राजधानी मुंबईत आज (शुक्रवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची घसरण नोंदविली गेली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्याची भावात घसरण दिसून येत आहे

Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण, मुंबईतले दर 450 रुपयांनी गडगडले; जाणून घ्या आजचे भाव
gold
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 5:10 PM

मुंबई : महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात (Maharashtra Gold Rate) कालच्या तुलनेत आज मोठी घसरण दिसून आली. राजधानी मुंबईत आज (शुक्रवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची घसरण नोंदविली गेली. गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्याची भावात घसरण दिसून येत आहे. राजधानी मुंबईत (Mumbai Gold rate) 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49,200 आणि 22 कॅरेट सोन्याला 45,100 रुपये भाव मिळाला. कोविड काळात गुंतवणूकदार बाजाराच्या अस्थिरतेचा सामना करत आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेकांचा सोने गुंतवणुकीकडे (Gold Investment) वाढता कल आहे. गेल्या काही दिवसांत सोने खरेदीत मागणी वाढली आहे. सोन्याच्या दैनंदिन बाजारभावावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव जाणून घेऊया…

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळा)

  • मुंबई : 49200 रुपये (रु. 450 घसरण)
  • पुणे : 49060 रुपये (रु. 10 वाढ)
  • नागपूर : 49200 रुपये (रु. 450 घसरण)
  • नाशिक : 49050 रुपये (रु. 0 वाढ/घसरण)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळe):

  • मुंबई : 45100 रुपये (रु. 400 घसरण)
  • पुणे : 45050 रुपये(रु. 0 वाढ/घसरण)
  • नागपूर : 45100 रुपये(रु. 400 घसरण)
  • नाशिक : 45050 रुपये(रु. 0 वाढ)

सोन्याच्या किंमती घसरणार

HDFC सिक्युरिटीजचे समीक्षक तपन पटेल यांच्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती कमी झाल्याने देशातील सोन्याच्या किंमतींवर त्यांचा परिणाम झाला आहे. येणाऱ्या काळात सोन्याच्या (Gold Rate Fall) किंमती आणखी घसरु शकतात.

भावात अस्थिरता, गुंतवणुकदार दोलायमान?

सोन्याच्या भावात अस्थिरता दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात पडछड नोंदविल्यानंतर गुंतवणुकदारांनी सोने खरेदीला पुन्हा प्राधान्य दिले होते. सोने गुंतवणूक सुरक्षिततेचा पर्याय मानला जातो. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भाववाढीचा आलेख खालावला होता. मात्र, आज सोन्याचे भाव उंचावले आहेत. त्यामुळे सोने खरेदीचा दर पुन्हा मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमुळे अर्थतज्ज्ञांची सोन्याच्या भावात चढ-उताराची स्थिती राहील असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांनी वर्तविलेला आहे.

निर्धास्त राहा, मिस्ड् कॉल करा:

तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.

सोन्याची खरेदी करताना सावधान?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

ही सवय बनवेल तुम्हाला लखपतीच नाही तर करोडपती, दरमहिन्याला एक हजारांची बचतीतून व्हा करोडपती! 

खुशखबर!, 100 पेटीएम भाग्यवंतांना एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार मोफत

भारतातील बेरोजगारीचे वास्तव समजून घ्या एका क्लिकवर

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.