AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थायलंडला जाणे पडले महागात! तीन दिवसांपासून प्रवासी अडकून पडले

एअर इंडियाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आणि म्हटले की 16 नोव्हेंबरची फ्लाइट "तांत्रिक समस्येमुळे" रद्द करण्यात आली. पण अजूनही अनेक प्रवासी थायलंडमध्ये अडकून पडले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना थायलंडमध्येच राहावे लागले आहे.

थायलंडला जाणे पडले महागात! तीन दिवसांपासून प्रवासी अडकून पडले
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 20, 2024 | 2:05 AM
Share

नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील शंभरहून अधिक प्रवासी 80 तासांहून अधिक काळ थायलंडमध्ये अडकून पडले आहेत. हे विमान 16 नोव्हेंबरच्या रात्री दिल्लीसाठी उड्डाण करणार होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे सहा तास उशीर झाला. प्रवाशांचे म्हणणे आहे की त्यांना तासनतास वाट पाहिल्यानंतर त्यांना विमानात चढण्यास सांगण्यात आले, परंतु तासाभरानंतर त्यांना पुन्हा उतरवण्यात आले आणि विमान रद्द करण्यात आले.

एअर इंडियाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, 16 नोव्हेंबरचे विमान तांत्रिक समस्येमुळे रद्द करण्यात आले आहे. विमान कंपनीने असेही म्हटले आहे की ग्राउंड स्टाफने हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यासह प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. काही प्रवाशांना पर्यायी विमानानेही पाठवण्यात आले. याशिवाय पूर्ण परतावा देण्याचा पर्यायही देण्यात आला होता. एअर इंडियाने असेही म्हटले आहे की “प्रवासी आणि चालक दलाची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे.”

प्रवाशांमध्ये वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश होता. विमान पुन्हा उड्डाणासाठी तयार होते. प्रवाशांचे म्हणणे आहे की त्यांना तेच विमान असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला होता. विमानाने उड्डाण केले, परंतु सुमारे अडीच तासांच्या उड्डाणानंतर ते पुन्हा फुकेत येथे उतरवण्यात आले आणि प्रवाशांना पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून प्रवासी फुकेत अडकून पडले आहेत.

फ्लाइट ट्रॅकिंग ॲप FlightRadar मध्ये, हे पाहिले जाऊ शकते की फुकेतला परत येण्यापूर्वी विमानाने दोन तासांचा प्रवास केला होता. विमान कंपनीच्या प्रतिनिधींकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप प्रवाशांनी सोशल मीडियावर केला आहे. एअरलाइन्सच्या सूत्रानुसार, “अनेक प्रवाशांना परत पाठवण्यात आले आहे, सुमारे 40 प्रवासी अजूनही फुकेतमध्ये आहेत, त्यांना संध्याकाळी परत पाठवले जाईल.”

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...