AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

By Election Results 2022 : 5 जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपला झटका, बंगालमध्ये टीएमसीची जादू, ममतांचं अभिनंदन

By Election Results 2022 : देशातील एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. चार राज्यांपैकी बंगालमध्ये टीएमसी, बिहारमध्ये आरजेडी आणि छत्तीसगड आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. बंगालमधील बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून बाबुल सुप्रियो आघाडीवर आहेत तर महाराष्ट्रातील कोल्हापुरातून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी काँग्रेसचा गड राखत दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव […]

By Election Results 2022 : 5 जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपला झटका, बंगालमध्ये टीएमसीची जादू, ममतांचं अभिनंदन
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC अध्यक्षा ममता बॅनर्जीImage Credit source: TV9
| Updated on: Apr 16, 2022 | 2:56 PM
Share

By Election Results 2022 : देशातील एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. चार राज्यांपैकी बंगालमध्ये टीएमसी, बिहारमध्ये आरजेडी आणि छत्तीसगड आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. बंगालमधील बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून बाबुल सुप्रियो आघाडीवर आहेत तर महाराष्ट्रातील कोल्हापुरातून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी काँग्रेसचा गड राखत दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे स्वप्न सत्यात उतरवलं आहे. त्याचवेळी बिहारच्या बोचाहान मतदारसंघातून आरजेडीचा उमेदवार आघाडीवर आहे. 12 एप्रिल रोजी छत्तीसगड, महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी एका विधानसभेच्या जागेवर मतदान झाले होते. शनिवार, १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून 1 लोकसभा (Lok Sabha) आणि 4 विधानसभा (Vidhan Sabhas) जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये बाबुल सुप्रियो यांच्यामुळे रिक्त झालेल्या बंगालच्या आसनसोल लोकसभेच्या जागेचाही समावेश आहे. त्यानंतर आता छत्तीसगड, महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी एका विधानसभेच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही येत आहेत.

यादरम्यान अख्या देशाचे लक्ष हे पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर आहे. कारण या दोन्ही जागांवर आधी भाजपचे असणारे चेहरे भाजपविरोधातच निवडणूकीत उतरले आहेत. तर कोल्हापुरातून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे सध्याचे हाती येणारे निकाल पाहता देशात पाच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत चार ठिकाणी घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपची मात्र या पोटनिवडणुकीत पिछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे 4 राज्यांमधील 4 विधानसभा आणि एका लोकसभेच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमधील एका विधानसभेच्या आणि एका लोकसभेच्या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. बंगालमधील दोन्ही जागांवर टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा आणि बाबुल सुप्रियो आघाडीवर आहेत. आसनसोल लोकसभा मतदारसंघात शत्रुघ्न सिन्हा 1 लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. तर बालीगंगे विधानसभा पोटनिवडणुकीत टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो हे 18व्या फेरीनंतर बॅबिलोन 17 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या 18व्या फेरीनंतर बाबुल सुप्रियो यांना 48 हजार 109, सीपीआयएमला 30 हजार 190 आणि भाजपला 12 हजार 035 मते मिळाली आहेत.

ही नवीन वर्षाची भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आसनसोल लोकसभेच्या मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करून लिहिले की, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निर्णायक जनादेश दिल्याबद्दल आसनसोल लोकसभा मतदारसंघ आणि बालीगंगे विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे मी मनापासून आभार मानते. आम्ही आमच्या माँ-मती-मानुष संस्थेला आमच्या लोकांनी दिलेली एक मनःपूर्वक चांगली भेट मानतो. आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मतदारांना पुन्हा एकदा सलाम.

आरजेडीने जनतेचे अभिनंदन केले

मुझफ्फरपूर आरजेडीने जनतेचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील बोचाहान विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आरजेडीचे उमेदवार अमर कुमार पासवान आघाडीवर आहेत. बोचनमध्ये 20 फेऱ्यांनंतर आरजेडीची आघाडी 27 हजारांच्या पुढे गेली असून आरजेडीला 27731 मतांची आघाडी मिळाली आहे. अमर पासवान यांना 64552 मते मिळाली आहेत. भाजपच्या बेबी कुमारी यांना 36781 आणि गीता कुमारी (व्हीआयपी) यांना 21570 मते मिळाली.

कोल्हापूर अटीतटीच्या निवडणुकीत जयश्री जाधव विजयी

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुक ही भाजपकडून अटीतटी करण्यात आली होती. त्याचा आज निकाल हाती आला. त्यात भाजपचा सुपडासाफ झाला असून काँग्रेसने आपला गड राखला आहे. या निवडणूकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी मैदान मारत भाजप उमेदवार सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना मोठी धोबीपछाड दिली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणुक लागली होती. सुरूवातीला ही निवडणूक बिनविरोधी करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून करण्यात आला. मात्र भाजपने या जागेवर जयश्री पाटील यांना भाजपकडून लढण्याची ऑफर दिली. मात्र जयश्री पाटील यांनी भाजपकडून लढण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने या जागी सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली. तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील हे या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. या पोटनिवडणुकीत अनेक नाट्यमय घाडामोडी घडताना दिसून आल्या.

छत्तीसगड : खैरागडमध्ये काँग्रेस आघाडीवर

छत्तीसगडमधील खैरागड पोटनिवडणुकीचा विचार करता येथेही भाजपवर काँग्रेस वरचढ होताना दिसत आहे. येथे दहाव्या फेरीनंतर काँग्रेस उमेदवार 12 हजार 156 मतांनी आघाडीवर आहेत. तर दहाव्या फेरीत भाजप उमेदवाराला 2553 तर काँग्रेस उमेदवाराला 4705 मते मिळाली.

इतर बातम्या :

पत्नीकडून 10 हजार उसने घेत सुरु केली कंपनी, आज झाला वटवृक्ष

Kolhapur North By Election 2022 : वडील गेले, पण कोल्हापूरने मोठेपणा दाखवला, आईच्या विजयानंतर मुलाची भावुक प्रतिक्रिया, भाजपनं परंपरा न पाळल्याचा आरोप

VIDEO : मनसेकडून Dadar च्या हनुमान मंदिरात पूजा, Sandeep Deshpande यांची प्रतिक्रिया

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.