#SurakshaBandhan: Gulf SuperFleet आणि TV9 Network चा उपक्रम, देशात 10 हजार ट्रक चालकांचे केले जाणार मोफत लसीकरण

Gulf Superfleet टिव्ही 9 तसेच Big FM च्या सहयोगाने संपूर्ण देशात लसीकरण मोहीम राबवणार आहे. या मोहिमेंतर्गत एकूण दहा हजार ट्रक चालकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात देण्यात येत आहे.

#SurakshaBandhan: Gulf SuperFleet आणि TV9 Network चा उपक्रम, देशात 10 हजार ट्रक चालकांचे केले जाणार मोफत लसीकरण
tv9 vaccination
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 7:11 PM

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही हे संकट पूर्णपणे संपलेले नाही. देशात ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतच आहेत. कोरोनााच विळखा वाढल्यानंतर  मागील वर्षभरापासून लॉकडाऊनसह अनेक प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर औषधी, अन्न तसेच इतर वस्तूंच्या पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून ट्रक चालकांनी मोठी मेहनत घेतली. सगळे लोक घरात बसलेले असताना ट्रक चालकांनी जीव धोक्यात घालून औषधी तसेच अन्न भारतभर पोहोचवले. ट्रक चालकांचे हेच समर्पण लक्षात घेऊन Gulf Superfleet टिव्ही 9 तसेच Big FM च्या सहयोगाने संपूर्ण देशात लसीकरण मोहीम राबवणार आहे. या मोहिमेंतर्गत एकूण दहा हजार ट्रक चालकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात देण्यात येत आहे. देशातील प्रमुख 11 शहरांमध्ये ही मोहीम राबवली जात असून त्याला Gulf Superfleet Suraksha बंधन, सीझन-3 असे नाव देण्यात आले आहे. (truck driver Corona vaccination drive across India by Gulf Oil Lubricants India Limited with TV9 News Network)

10 हजार ट्रक चालकांना कोरोना लस देण्यात येणार

या मोहिमेची सुरुवात 6 ऑगस्टपासून झाली आहे. येत्या 22 ऑगस्टपर्यंत एकूण 10 हजार ट्रक चालकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. Gulf Superfleet Suraksha बंधन, सीजन-3 या मोहिमेची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्तुती केली. “देशाने कोरोनाच्या दुसऱ्या आणि पहिल्या लाटेचा धाडसाने सामना केला. यामध्ये ट्रक चालकांना लस देण्याची जी मोहीम राबवली जात आहे, ती अतिशय चांगली आहे. मी वाहतूक मंत्री असल्यामुळे Gulf Superfleet, देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 आणि Big FM यांचे आभार मानतो,” असे गडकरी म्हणाले.

या मोहिमेमुळे ट्रक चालकांचं साहस वाढेल

तसेच या उपक्रमाची केंद्रीय राज्यमंत्री व्हीके सिंह यांनीसुद्धा स्तुती केली आहे. “देशाच्या कानाकोपऱ्यात सामान पुरवण्याचं काम ट्रक चालकांनी केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज भासत होती. यावेळी ट्रक चालकांनी ऑक्सिजन पुवठ्याचे मोठे काम केले. टीव्ही 9 न्यूज नेटवर्कने ही बाब समूजन घेतली. सहा ऑगस्टपासून ट्रक चालकांचे लसीकरण केले जात आहे. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमामुळे ट्रक चालकांमधील साहस वाढेल,” असं व्हीके सिंह म्हणाले.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा बंधन वाढवण्याचा प्रयत्न

तसेच गल्फ ऑईल लुब्रिकेंट्स इंडिया लिमिटेडचे एमडी आणि सीईओ रवी चावला यांनी या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली आहे. “आमचे गल्फ सुपरफ्लीट टर्बो प्लस नावाचे एक प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्ट ट्रकसाठी लॉन्च करण्यात आलेले आहे. या प्रोडक्टनिमित्त तसेच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सुरक्षा बंधन वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. या मोहिमेंतर्गत ट्रक ड्रायव्हर्सची काळजी घेतली जाईल. या मोहिमेतून जवळपास दहा हजार ट्रक ड्रायव्हर्सना कोरोना लस दिली जाईल,” असे रवी चावला म्हणाले.

टीव्ही 9 च्या लसीकरण कॅम्पमध्ये जाऊन लस घेण्याचे आवाहन

टीव्ही 9 न्यूज नेटवर्क हे देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क आहे. या नेटवर्कने कोरोना महामारीच्या काळात लोकांना जागरूक करण्याचं काम केलं. तसेच कोरोना नियम पाळण्यासाठी प्रेरित केलेलं आहे. या मोहिमेविषयी बोलताना TV9 भारतवर्षचे न्यूज़ डायरेक्टर हेमंत शर्मा यांनीसुद्धा या कार्यक्रमाची स्तुती केली. “कोरोना काळात ट्रक ड्रायव्हर्सने मानवतेची सेवा केली आहे. टीव्ही 9 न्यूज नेटवर्कने कोरोनाच्या काळात लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम केले. आता आम्ही ट्रक चालकांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांचे लसीकरण करत आहेत. गल्फ सुपरफ्लीट सुरक्षा बंधन सीजन-3 या मोहिमेंतर्गत लसीकरणाची मोहीम पार पडेल. चालकांनी लसीकरण कॅम्पमध्ये जाऊन लस घ्यावी,” असे हेमंत शर्मा म्हणाले आहेत. तर ट्रक चालक पुरवठ्याची चेन बिघडू देत नाहीयेत. ते विविध वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवतात. म्हणूनच आम्ही दहा हजार ट्रक चालकांना लस देण्याच दृढ निश्चय केलेला आहे, असं बिग एफएमचे सीएफओ आणि सीबीओ आशिष चटर्जी म्हणाले आहेत.

नारायणा हेल्थ आणि मेदांताचे लसीकरणासाठी सहकार्य

तसेच नारायणा हेल्थ आणि मेदांता ट्रक चालकांचे मोफत लसीकरण करण्यास सहकार्य करत आहे. याविषयी बोलताना नारायण हेल्थचे संस्थापक आणि संचालक डॉ. देवी शेट्टी यांनी “ट्रक चालकांनी कोरोनाकाळात औषध आणि अन्न पुरवठ्यात खंड पडू दिला नाही. Gulf SuperFleet, TV9 Network, Big FM या तीन संस्था लसीकरण करण्याचे उदात्त काम करत आहेत,” असं म्हटलंय.

11 शहरांमध्ये लसीकरण मोहीम राबवली जाईल

दरम्यान, सुरक्षा बंधन अभियानांतर्गत देशात एकूण 11 शहरांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम राबवली जाईल. यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, करनाल, बद्दी, इंदोर, फरिदाबाद, गाझियाबाद, लखनऊ, जालंधर आणि लुधियाना या शहरांचा समावेश आहे. 6 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत ही मोहीम राबवली जात आहे.

इतर बातम्या :

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांची पुन्हा एकदा चौकशीला दांडी! ईडी काय कारवाई करणार?

रॅगिंग की मानसिक अस्थैर्य, नाशिकमधील डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूचं नेमकं कारण काय?

सोनिया गांधींच्या नेतृत्त्वात विरोधी पक्षांची बैठक, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीबाबत मोठा निर्णय

(truck driver Corona vaccination drive across India by Gulf Oil Lubricants India Limited with TV9 News Network)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.