AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजनैतिक भागिदारी आणि व्यापार करारावर चर्चा…पीएम मोदी आणि जेडी वेन्स यांच्या भेटीत काय घडलं?

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स हे चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय व्यापार करार, ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञानातील सहकार्यावर चर्चा केली. या भेटीने भारत-अमेरिका संबंधांना चालना मिळाली असून, दोन्ही देशांमधील व्यापार वाढविण्यावर भर देण्यात आला.

राजनैतिक भागिदारी आणि व्यापार करारावर चर्चा...पीएम मोदी आणि जेडी वेन्स यांच्या भेटीत काय घडलं?
US Vice President JD VanceImage Credit source: tv9 marathi
Updated on: Apr 21, 2025 | 11:30 PM
Share

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळीच ते दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेन्स यांचं स्वागत केलं. आपल्या चार दिवसाच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी वेन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी भारत-अमेरिका दरम्यानच्या द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती वेन्स यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारामधील प्रगतीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच, दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताचे प्रादेशिक आणि जागतिक मुद्दे, विशेषतः ऊर्जा, संरक्षण आणि टॅक्टिकल टेक्नोलॉजीसारख्या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना शुभेच्छा दिल्या असून, वर्षाच्या अखेरीस त्यांच्या भारत भेटीची प्रतिक्षा असल्याचे सांगितले.

बायडेननंतरचे पहिले उपराष्ट्रपती

उपाध्यक्ष वेन्स आणि त्यांचे कुटुंब सध्या 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. 2013 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती जो बायडेन यांच्या भारत भेटीनंतर हे अमेरिकेचे पहिले उपराष्ट्रपती आहेत जे भारतात आले आहेत. ही भेट अशा वेळी होत आहे जेव्हा अध्यक्ष ट्रंप यांनी भारतासह इतर देशांवर लावण्यात आलेले व्यापक आयात शुल्क तात्पुरते स्थगित केले आहेत.

US Vice President JD Vance

US Vice President JD Vance

द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा सुरू

भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात शुल्क, व्यापार संतुलन आणि बाजारात प्रवेश या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे. या भेटीदरम्यान उपाध्यक्ष वेन्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जयपूर व आग्रा या शहरांना भेट देण्याचे नियोजन आहे, ज्यामुळे ही भेट केवळ धोरणात्मकच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाची ठरत आहे.

US Vice President JD Vance

US Vice President JD Vance

ब्रेंडन लिंच यांचा बीटीएवर फोकस

आजच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी उपाध्यक्ष वेन्स, त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषा चिलुकुरी वेन्स आणि अमेरिकन प्रतिनिधी मंडळाच्या सन्मानार्थ रात्रभोजनाचे आयोजन केले. अमेरिका सध्या भारतावर त्यांच्या तेल, वायू आणि संरक्षण उपकरणांच्या खरेदीसाठी दबाव टाकत आहे, ज्यामुळे सुमारे 45 अब्ज डॉलर्सचा व्यापार तुटीचा फरक भरून काढता येईल. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे सहायक व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांनी भारत भेट देऊन बीटीएबाबत भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

US Vice President JD Vance

US Vice President JD Vance

उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे.
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी.
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा.
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात..
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात...
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे.
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट.
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले..
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले...
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया.
प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्...
प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्....