अयोध्येहून परतताना उद्धव ठाकरे थोडक्यात बचावले!

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्या यात्रेहून परतणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थोडक्यात बचावले. फैजाबाद विमातळावर उद्धव ठाकरेंचा अपघात होता होता टळला. फैजाबाद विमानतळावर विमानापुढे नील गाय आल्याने गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने विमानाला काहीही झाले नाही आणि उद्धव ठाकरे व कुटुंबीय बचावले. अयोध्येत काल शरयू नदीवर महाआरती आणि त्यानंतर आज रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे …

अयोध्येहून परतताना उद्धव ठाकरे थोडक्यात बचावले!

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्या यात्रेहून परतणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थोडक्यात बचावले. फैजाबाद विमातळावर उद्धव ठाकरेंचा अपघात होता होता टळला. फैजाबाद विमानतळावर विमानापुढे नील गाय आल्याने गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने विमानाला काहीही झाले नाही आणि उद्धव ठाकरे व कुटुंबीय बचावले.

अयोध्येत काल शरयू नदीवर महाआरती आणि त्यानंतर आज रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने परतले आहेत. मुंबई विमानतळावरही त्यांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. विमानतळाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली आहे.

उद्धव ठाकरे अयोध्येत!

उद्धव ठाकरे हे कालपासून अयोध्यायात्रेवर आहेत. राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांची फौज घेऊन अयोध्येत दाखल झाले आहेत. काल उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रसिद्ध शरयू नदीवर महाआरती झाली. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

राम मंदिर भाजपचा चुनावी जुमला : उद्धव ठाकरे

निवडणूक आल्यानंतरच काहीजण रामाचं नाव घेतात. निवडणुकीत राम राम करतात आणि नंतर मग आराम करतात, असा शाब्दिक हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. तसेच, अच्छे दिन, 15 लाखांसारखाच ‘राम मंदिर’ हा सुद्धा भाजपचा चुनावी जुमला आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

संबंधित बातम्या :

राम मंदिर भाजपचा चुनावी जुमला : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे

अयोध्येतही सेनेची ‘डरकाळी’, पक्षाची पहिली शाखा सुरु

व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *