AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन गडकरी यांची रात्री 8 वाजता स्वाक्षरी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोलऐवजी इथेनॉल पण..

E100 Fuel : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने इथेनॉलबद्दल ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाने देशावरील परकीय चलनाचा दबाव कमी होईल. ही मोठी कामगिरी आहे. 100 टक्के इथेनॉलला सरकारकडून मंजूरी दिली. याबाबत नितीन गडकरी यांनी माहिती दिली.

नितीन गडकरी यांची रात्री 8 वाजता स्वाक्षरी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोलऐवजी इथेनॉल पण..
Union Minister Nitin Gadkari and pm modi
| Updated on: Jun 16, 2026 | 6:47 AM
Share

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील दाखवला आहे. इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोलचे दर सातत्याने वाढताना दिसले. भारत पेट्रोल-डिझेलकरिता खाडी देशांवर अवलंबून आहे. मात्र, त्याचा पर्याय म्हणून इथेनॉलकडे बघितले जातंय. याबाबत केंद्र सरकार महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. पेट्रोलवरील पर्याय म्हणून इथनॉलकडे बघितले जातंय. नितिन गडकरी यांनी रात्री 8 वाजता या महत्वाच्या फाईलवर सहीवर केली. पेट्रोल महाग आहे, डिझेलचे भविष्य अनिश्चित आहे.  इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत रेंज अँझायटीचे सावट अजूनही कायम आहे. सरकारने आता एक नवीन पाऊल उचलले आहे. इथेनॉलला मंजुरी दिली. पेट्रोलवरील सर्व गाड्या आता इथेनॉलवर चालवल्या जाऊ शकतात का?. इथेनॉल नक्की काय आहे, याबाबत जाणून घेऊयात.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरातील एका कार्यक्रमात बोलताना आनंदाने सांगितले की, इथेनॉल इंधनासाठीच्या नियमावलीला मंजुरी देण्यात आली आहे. यासंबंधित फाईलवर मी रात्री 8 वाजता स्वाक्षरी केली. आता देशभरात इथेनॉल कायदेशीररित्या वापरले जाऊ शकते. सरकारच्या या घोषणेनंतर इथेनॉल म्हणते नक्की काय आहे, याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

नितीन गडकरी यांनी म्हटले की, दीड ते दोन महिन्यांत ह्युंदाई, टोयोटा आणि एमजी मोटरसारख्या कंपन्याही त्यांच्या फ्लेक्स-फ्यूल कार बाजारात आणतील. इथेनॉल इंधनाकडे पारंपारीक इंधन म्हणून बघितले जाते. इथेनॉल हे मका, ऊस तांदूळ आणि शेतीतील टाकाऊ पदार्थ यांच्या मदतीने तयार केले जाते. इथेनॉलवर गाड्या आरामात चालू शकतात. पेट्रोल ऐवजी बेस्ट पर्याय इथेनॉल आहे.

इथेनॉल भारतातच तयार केले जाते. कोणत्याही देशावर याकरिता अवलंबून राहण्याची अजिबात गरज नाही. शिवाय परकिय चलनावरील दबाव देखील यामुळे कमी होऊ शकतो. त्यामुळेच केंद्र सरकारकडून इथेनॉलला 100 टक्के मंजूरी देण्यात आली. भारतात आधीच E20 पेट्रोलचा वापर केला जात आहे. राज्यात 20 टक्के इथेनॉल तर 80 टक्के पेट्रोल असते. ज्यामुळे मोठ्या पैशांची बचत होत आहे. जर पूर्णपणे इथेनॉलचा पावर शक्य झाला तर हे भारताचे मोठे यश म्हणावे लागेल.

इथेनॉलचा वापर वाढला तर भारतातील पैस बाहेर जाणार नाही. यात शेतकऱ्यांचा फायदा आहे. थेट शेतकऱ्यांना पैसा मिळेल. इथेनॉल पूर्णपणे पेट्रोलची जागा घेईल का? हा लागलीच सांगणे कठीण आहे. इथेनॉल इंधनाचे काही फायदे आहेत पण त्याचे तोटेही आहेत. पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल इंधनाची ऊर्जा घनता कमी असते. सरकारकडून आता घोषणा करण्यात आली असली तरीही याकरिता थोडा वेळ लागणार आहे. ही एक मोठी वेळ घेणारी प्रक्रिया आहे.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल