AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकार देतय, दर महिन्याला ‘इतक्या’ लाख नोकऱ्या, रोजगाराची चिंताही मिठणार…

भारतातील तरुणांना रोजगारा चिंता आहे, त्यामुळे या गोष्टीचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यांना एकच गोष्ट, एकच मंत्र आठवला तर त्यांच्या मनात कधीही शंका येणार नाही.

मोदी सरकार देतय, दर महिन्याला 'इतक्या' लाख नोकऱ्या, रोजगाराची चिंताही मिठणार...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 23, 2022 | 12:52 AM
Share

नवी दिल्लीः  भारतात सध्या केंद्र सरकारकडून दर महिन्याला सुमारे 16 लाख नोकऱ्या निर्माण करण्यात येत असल्याचा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्रीय राखीव पोलीस दलाने अजमेरमध्ये आयोजित केलेल्या ‘रोजगार मेळाव्या’ च्या कार्यक्रमप्रसंगी वैष्णव बोलत होते. वैष्णव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘या सरकारमध्ये दरमहा सुमारे 16 लाख नोकऱ्या निर्माण होत आहेत आणि पारदर्शकता हीच या मोदी सरकारची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

जगभरातील आर्थिक संकटाच्या परिस्थितीतही भारत हा ऊर्जास्रोत म्हणूनच सगळ्यांसमोर उदयास आला असल्याचे सांगण्यात आले. नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट हा मंत्र तरुणांना अंगीकारण्याचे आवाहन करत ते म्हणाले की, जीवनात तेच लोक जिंकतात ज्यांनी आपल्या कर्तव्यात राष्ट्राला प्रथम स्थान दिले असं त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.

आता भारतातील तरुणांना रोजगारा चिंता आहे, त्यामुळे या गोष्टीचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यांना एकच गोष्ट, एकच मंत्र आठवला तर त्यांच्या मनात कधीही शंका येणार नाही.

राष्ट्र प्रथम आणि ते नेहमीच प्रथम हा मंत्र असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जीवनाच्या विविध क्षेत्रांतून अनेक उदाहरणे घेता येतील, परंतु केवळ तेच लोक पुढे गेले, त्यांनाच समाधान आणि विजय मिळाला ज्यांनी आपल्या कर्तव्यात राष्ट्राला प्रथम स्थान दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 हून अधिक तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल