UPSC : यूपीएससी प्राथमिक परीक्षेचा निकाल जाहीर, या थेट लिंकने निकाल पाहा

युपीएससीच्या प्राथमिक परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागणार आहे. त्याची सर्व तारखा आणि माहीती वेबसाईटवर पाहाता येणार आहे.

UPSC : यूपीएससी प्राथमिक परीक्षेचा निकाल जाहीर, या थेट लिंकने निकाल पाहा
UPSC Prelims result 2024Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 9:19 PM

देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक असलेल्या युपीएससीच्या  प्राथमिक परीक्षेचा अखेर लागला आहे. त्यामुळे या परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन प्राथमिक परीक्षेचा निकाल पाहाता येणार आहे.  देशभरातील लाखो मुले या परीक्षेला बसतात.  केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( UPSC ) आज ( सोमवारी 1 जुलै ) नागरी सेवा ( प्राथमिक ) परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकणार आहेत.

जे उमेदवार सिव्हील सेवा प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. ते आता पुढील महत्वाच्या युपीएससी सीएसई मुख्य परीक्षा 2024 ला बसण्यास पात्र झाले आहेत. या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना मुलाखती आणि व्यक्तीत्व चाचणी परीक्षाला निवडले जाणार आहेत. या युपीएससी परीक्षेच्या नियमानूसार आता सर्व उमेदवारांना सिव्हील सेवा ( मुख्य ) परीक्षा 2024 साठी पुन्हा सविस्तर अर्ज पत्र -1 ( DAF -1 ) करावा लागणार आहे.

UPSC ची प्राथमिक परीक्षा 16 जून रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या नागरी सेवा ( प्राथमिक ) परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकाराचे दोन पेपर होते ( ( बहुपर्यायी प्रश्न ) आणि जास्तीत जास्त 400 गुण होते. UPSC नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-II मधील किमान 33% पात्रता गुण आणि नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-I मधील एकूण पात्रता गुणांनूसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. नागरी सेवा ( मुख्य ) परीक्षा परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS) यांचा समावेश आहे. एकूण रिक्त पदांपैकी 40 पदे अपंगत्व श्रेणीतील व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत.

UPSC प्रीलियम परीक्षा 2024 निकाल असा पाहावा

पायरी 1 : सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.

पायरी 2 : आता मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या UPSC नागरी सेवा ( प्राथमिक ) निकाल 2024 लिंकवर क्लिक करा.

पायरी 3 : आता एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना आवश्यक तपशील टाकावे लागतील.

पायरी 4 : आता सबमिट पर्यायावर क्लिक करताच निकाल तुम्हाला दिसेल

पायरी 5 : निकाल तपासा आणि निकालाचे प्रिंटआऊट काढून त्याची हार्ड कॉपी स्वत:जवळ बाळगा

Non Stop LIVE Update
कोकण रेल्वे गेल्या 24 तासांपासून ठप्प, ट्रॅकवरील दरड बाजूला पण तरीही..
कोकण रेल्वे गेल्या 24 तासांपासून ठप्प, ट्रॅकवरील दरड बाजूला पण तरीही...
मुस्लिम समाजाचा कल विधानसभेलाही मविआकडेच? सर्व्हेतून काय आलं समोर?
मुस्लिम समाजाचा कल विधानसभेलाही मविआकडेच? सर्व्हेतून काय आलं समोर?.
मनोज जरांगे पाटील MIM शी युती करणार? इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील MIM शी युती करणार? इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?.
ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य
ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य.
धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू
धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू.
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया.
आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द
आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द.
भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्...
भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्....
फक्त QR कोड स्कॅन करा, लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?
फक्त QR कोड स्कॅन करा, लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?.
वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?
वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?.