ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. २६ निष्पाप नागरिकांचा यात बळी गेला होता. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट होती. अखेर दोन आठवड्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानात घुसून नऊ दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. यानंतर अमेरिकेतून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण ९ दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल. बुधवारी मध्यरात्री तिन्ही दलाच्या सैन्याने संयुक्तिकरित्या ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं. रात्री दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये भारताच्या हवाई हल्ल्याला आणि संपूर्ण परिस्थितीला लज्जास्पद म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या एअरस्ट्राईकबद्दल विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की, ‘आम्ही त्याबद्दल ऐकले आहे. हे लज्जास्पद आहे. मला आशा आहे की हे लवकरच संपेल. दोन शक्तिशाली देशांना युद्धाच्या मार्गावर जाताना कोणीही पाहू शकत नाही. या दोन्ही देशांमधील इतिहास खूप जुना आहे आणि तणाव शिगेला पोहोचला आहे. पण या जगाला युद्धाची नव्हे तर शांतीची गरज आहे.’ मला वाटतं लोकांना थोड्याशा भूतकाळाच्या आधारे काहीतरी घडणार आहे हे माहित होतं, असंही ट्रम्प पुढे म्हणाले.
President Trump reacts to the news that India has launched missile strikes into Pakistan. https://t.co/TC2ROCL7wW
📺 Sky 501, Virgin 602, Freeview 233 and YouTube pic.twitter.com/fEhnhChPeh
— Sky News (@SkyNews) May 6, 2025
वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारताच्या हवाई हल्ल्यानंतर लगेचच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेच्या एनएसए आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना फोन केला आणि त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला याबाबत माहिती आहे. सध्या आपण जास्त काही सांगण्याच्या स्थितीत नाही. सध्या आम्ही सध्याच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
