सपा आमदार पुष्पराज जैन पम्पी यांच्या घरावर आयटीची छापेमारी; अत्तराच्या फायाने समाजवादी घायाळ होणार?

अत्तराच्या फायामुळे समाजवादी पार्टीला भोवळ येणार असल्याचं चित्रं आहे. पीयूष जैन या अत्तराच्या व्यापाऱ्याच्या घरावर छापेमारी करून आयकर विभागाने नोटांचा डोंगर शोधून काढला.

सपा आमदार पुष्पराज जैन पम्पी यांच्या घरावर आयटीची छापेमारी; अत्तराच्या फायाने समाजवादी घायाळ होणार?
IT raids
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 11:47 AM

कनौज्ज: अत्तराच्या फायामुळे समाजवादी पार्टीला भोवळ येणार असल्याचं चित्रं आहे. पीयूष जैन या अत्तराच्या व्यापाऱ्याच्या घरावर छापेमारी करून आयकर विभागाने नोटांचा डोंगर शोधून काढला. आता थेट अत्तराचे व्यापारी आणि समाजवादी पार्टीचे आमदार पुष्पराज जैन पम्पी यांच्या घरावर आयकर विबागाने छापेमारी केली आहे. याकूब परफ्यूमवरही आयकरा विभागाने छापेमारी केली आहे. विशेष म्हणजे पुष्पराज जैन यांनीच समाजवादी अत्तर लॉन्च केलं होतं.

पीयूष जैन यांच्या घरी छापेमारी केल्यानंतर एजन्सींना पुष्पराज जैनचं कनेक्शन सापडलं होतं. पुष्पराज जैन हे समाजवादी पार्टीचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. आयटी विभागाने जैन यांच्या घरी आणि कार्यालयासहीत 50 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. आज सकाळी 7 वाजता ही छापेमारी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयटी विभागाची एक टीम कन्नौजला उपस्थित आहे. या ठिकाणी लोकल पोलीस फोर्सही मागवण्यात आली आहे. आयकर विभागाने याकूब परफ्यूमवरही छापेमारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीच्या मालकाचा यापूर्वीच मृत्यू झालेला आहे. आयकर विभागने या दोन्ही व्यापाऱ्यांच्या 50 ठिकाणांवर छापे मारले आहेत. ही छापेमारी कानपूर, कन्नौज सूरत, तामिळनाडूच्या डिंडिगल आणि मुंबईतही केली जात आहे.

सपाचा आक्षेप

दरम्यान, या छापेमारीवर समाजवादी पार्टीने सवाल केला आहे. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी छापेमारी करताच ही छापेमारी केल्याचा दावा समाजवादी पार्टीने केला आहे.

प्रकरण काय?

कानपूरमधील व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर तीन दिवसांपूर्वी छापा टाकण्यात आला होता. या छाप्यामध्ये कोट्यावधीची बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली होती. तसेच मोठ्याप्रमाणात सोन्या, चांदीचे दागीने आणि काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी त्याची अनेक तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. तो सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. पियुष जैन याच्या घरातून जप्त करण्यात आलेली सर्व रक्कम ही टॅक्स चोरीची आहे. जैन याच्या घरातून पैशांनी भरलेले 42 बॉक्स जप्त करण्यात आले होते. 177 कोटी 45 लाख एवढी ही रक्कम आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम बॅंकेत जमा करण्यात आली आहे. दोन टप्प्यात ही रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे पियुष जैन यांने न्यायालयाला एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये त्यांने म्हटले आहे की, आपल्यावर टॅक्स चोरी प्ररणात 52 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात यावा, व उर्वरीत रक्कम मला परत मिळावी.

संबंधित बातम्या:

उत्तर प्रदेशमध्ये ठरलेल्या वेळीच निवडणुका, निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल नाही; मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

Kalicharan Maharaj : कालीचरण बाबाला दोन दिवसांची पोलीस कोठडी, गांधींजींबाबत संतापजनक विधान भोवलं

ओमिक्रॉनचे आणखी दोन नवे लक्षणं आले समोर; ‘हा’ त्रास होत असल्यास तातडीने घ्या डॉक्टरांचा सल्ला

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.