उत्तर प्रदेशमध्ये ठरलेल्या वेळीच निवडणुका, निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल नाही; मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा हे लखनऊमध्ये आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये ठरलेल्या वेळेत निवडणूक होणार असून, त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.

उत्तर प्रदेशमध्ये ठरलेल्या वेळीच निवडणुका, निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल नाही; मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 2:53 PM

लखनऊ : पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा हे लखनऊमध्ये आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये ठरलेल्या वेळेत निवडणूक होणार असून, त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. पुढे बोलताना चंद्रा यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांबाबत धाकधूक वाढली आहे. मात्र उत्तर प्रदेशातील सर्व राजकीय प्रमुख पक्ष कोरोनाच्या नियमाचे पालन करुन ठरलेल्या वेळेतच निवडणूक घेण्यासाठी आग्रही असल्याने निवडणुकीचा कार्यक्रम हा ठरलेल्या वेळेतच होईल. पाच जानेवारीला मतदारांची अंतिम यादी जारी करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

वृद्ध, अपंगांसाठी विशेष व्यवस्था

यावेळी बोलतान सुशील चंद्रा यांनी म्हटले आहे की, 80 वर्षांपुढील वृद्ध, अपंग व्यक्ती आणि कोरोनाबाधित असे जे नागरिक मतदानासाठी येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मतदानाची खास सोय करण्यात येईल. निवडणूक अधिकारी मत घेण्यासाठी त्यांच्याकडे जातील. सामान्यपणे उत्तर प्रदेशमधील मतदारांची एकूण संख्या ही 15 कोटींपेक्षा अधिक असून, मतदारांची अंतिम यादी आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. आतापर्यंत  52.8 लाख नव्या मतदारांनी नाव नोंदवले असून, त्यामध्ये 23.92 लाख पुरूष तर 28.86 महिलांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील प्रमुख पक्षांसोबत बैठक

आम्ही राज्यातील प्रमुख पक्षाबरोबर बैठक घेतली असून, सर्वांनीच ठरलेल्या वेळेत निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच निवडणुकांच्या प्राचारसभेत दोन समाजात फूट पाडणारे किंवा ज्यामुळे दंगे होऊ शकतात असे भाषण टाळले पाहिजे, असेही काही पक्षांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी जास्ती -जास्त वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी चंद्रा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

“मी अहमदाबादचा पोलिस आयुक्त बोलतोय…” पुण्यात पोलिसांनाच गंडवणारा भामटा मुंबईत जेरबंद

फडणवीसांसोबत सरकार बनवण्यासाठी तुम्हीच अजित पवारांना पाठवलं होतं का? शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया

Kalicharan Maharaj Arrested | कालीचरण महाराज यांना अखेर अटक, छत्तीसगड पोलिसांची कारवाई

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.