Kalicharan Maharaj Arrested | कालीचरण महाराज यांना अखेर अटक, छत्तीसगड पोलिसांची कारवाई

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि शिवराळ भाषा वापरणारा कालीचरण महाराज याला अखेर अटक करण्यात आलं आहे. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी ही कारवाई केलीय.

Kalicharan Maharaj Arrested | कालीचरण महाराज यांना अखेर अटक, छत्तीसगड पोलिसांची कारवाई
कालीचरण बाबाला ठाणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Dec 30, 2021 | 9:36 AM

रायपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि शिवराळ भाषा वापरणारा कालीचरण महाराज (kalicharan maharaj arrested) याला अखेर अटक करण्यात आलं आहे. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी ही कारवाई केलीय. कालीचरण महाराजाविरोधात तिक्रपरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी कारवाई करत कालीचरण महाराजला (kalicharan maharaj) मध्यप्रदेशमधील खजुराहोमधून ताब्यात घेतलंय.

रायगडमध्ये कालीचरण महाराजला अटक 

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल धर्मसंसदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आलंय. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी ही कारवाई केली असून याबाबत तिक्रपरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यप्रदेशमधील खजुराहो येथून महाराजाला अटक करण्यात आलंय.

नेमके काय म्हणाले होते कालीचरण महाराज?

कालीचरण महाराज महाराष्ट्रातील अकोला येथील असल्याचे समजते. त्यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली होती. त्यातले काही शब्द तर इथे लिहिलेही जाऊ शकत नाही. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानले आहेत. त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय. देशभरात सध्या विविध ठिकाणी धर्मसंसदेचं आयोजन केलं जातंय. त्यातली छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये जी धर्मसंसद पार पडली, त्यात कालीचरण महाराजानं हे तारे तोडले होते.

इतर बातम्या :

Akshay Kardile Wedding | भाजप नेते शिवाजी कर्डीलेंच्या घरी सनई चौघडे, मुलगा अक्षय कर्डीलेंचा शाही थाटात विवाह

ऐन नवीन वर्षांत रेल्वेचा दणका; 1 जानेवारीपासूनच नाशिक मार्गावरच्या 18 गाड्या रद्द!

रविवारी 24 तासांचा मेगा ब्लॉक, ठाणे-दिवा मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें