ऐन नवीन वर्षांत रेल्वेचा दणका; 1 जानेवारीपासूनच नाशिक मार्गावरच्या 18 गाड्या रद्द!

तपोवन, पंचवटी, नंदीग्राम, जनशताब्दी या गाड्यांसह मनमाड-नाशिक मार्गावरच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा हाल होणार आहेत.

ऐन नवीन वर्षांत रेल्वेचा दणका; 1 जानेवारीपासूनच नाशिक मार्गावरच्या 18 गाड्या रद्द!
भारतीय रेल्वे
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 30, 2021 | 8:42 AM

नाशिकः ऐन नवीन वर्षांत रेल्वे विभागाने एक मोठा दणका दिलाय. येत्या 1 ते 9 जानेवारीच्या दरम्यान नाशिक मार्गावरच्या तब्बल 18 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या आणि बाहेरगावी जाण्यासाठी नियोजन करणाऱ्यांनी आत्ताच सावध राहिलेले बरे. कारण एकतरी अजूनही एसटीसेवा सुरळीत सुरू नाही. त्यात या गाड्या रद्द झाल्यामुळे तुमची चांगलीच गैरसोय होऊ शकते. मुंबईत कळवा-दिवा दरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे तपोवन, पंचवटी, नंदीग्राम, जनशताब्दी या गाड्यांसह मनमाड-नाशिक मार्गावरच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगाब्लॉकमुळे ऐन नव्या वर्षाची सुरुवात अशी किरकिरीने होणार असून, या मार्गावरच्या प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत.

या गाड्या रद्द…

– नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस 1 व 2 जानेवारी रोजी धावणार नाही.
– जालना-मुंबई-जालना अप-डाऊन जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी 2 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस ही गाडी 2 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मुंबई-अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस ही गाडी 2 व 3 जानेवारी रोजी धावणार नाही.
– नागपूर-मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस ही गाडी 1 व 2 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मुंबई-जालना जनशताब्दी अप-डाऊन ही गाडी 8 व 9 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी अप-डाऊन ही गाडी 8 व 9 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मुंबई-अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी 8 व 9 जानेवारी रोजी धावणार नाही.
– नागपूर-मुंबई-नागपूर-सेवाग्राम एक्स्प्रेस अप-डाऊन ही गाडी अनुक्रमे 7, 8, 9, 10 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मुंबई-नांदेड-मुंबई एक्प्रेस ही गाडी 8, 9, 10 जानेवारी रोजी धावणार नाही.
– नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस ही गाडी 7, 8, 9 जानेवारी रोजी धावणार नाही.

नाशिक-कल्याण मेमू लोकल कधी?

नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे. आता महापालिका निवडणुकीपूर्वी तरी ही लोकल सुरू होते का, याची साऱ्यांना उत्सुकता आहे.

इतर बातम्याः

Video| माणुसकीला काळीमा, स्मशानातच सरणाची लाकडे घेऊन तुंबळ हाणामारी; नाशिकमध्ये कवी पाठारेंच्या अंत्यसंस्काराप्रसंगी आक्रीत

Nashik| 6 नगरपरिषदांवर प्रशासक; तर 6 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात

Nashik|पोर्तुगालहून आलेले दाम्पत्य बाधित; मालेगावात विदेशातून 106 जण आले, पिता-पुत्रावर उपचार सुरू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें