Valentine’s Day | विचारही केला नसेल अशा पद्धतीने साजरा केला जातो या देशांमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’

ब्रिटनमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची एक परंपरा आहे. या दिवशी 'जॅक' व्हॅलेंटाइन' नावाचे पात्र घरांचे दरवाजे ठोठावते. घरातील मुलांसाठी मिठाई, भेटवस्तू घरी सोडते. पण, या रहस्यमय व्यक्तीला अनेक मुले घाबरतात.

Valentine's Day | विचारही केला नसेल अशा पद्धतीने साजरा केला जातो या देशांमध्ये 'व्हॅलेंटाईन डे'
Valentine's DayImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 6:58 PM

नवी दिल्ली | 13 फेब्रुवारी 2024 : 14 फेब्रुवारी हा जागतिक प्रेम दिवस (Valentine’s Day) म्हणून जगभरात साजरा केला जातो. मात्र, वेगेवगळ्या देशात हा दिवस चित्र विचित्र पद्धतीने साजरा करतात. इंग्रजी भाषिक देशांमध्ये हा एक पारंपारिक दिवस आहे. या दिवशी साधारणत: प्रेमी युगुल व्हॅलेंटाईन कार्ड पाठवून, फुले देऊन एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. 18 व्या शतकापासून सुरु असलेली ही परंपरा आज 20 व्या शतकातही सुरु आहे. सिंगापूर, चीन आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशातील लोक व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सर्वाधिक पैसा खर्च करतात. यावरूनच या दिवसाचे महत्व लक्षात येते. जगभरातील देशांमध्ये हा दिवस कशा पद्धतीने साजरा करता हे पाहू.

डेन्मार्क आणि नॉर्वे या देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी) हा दिवस ‘व्हॅलेंटिन्सडाग’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी बरेच लोक जोडीदारासोबत कॅण्डल लाईट डिनर करण्यासाठी बाहेर पडतात. आपल्या प्रेमासाठी कार्ड आणि जोडीदाराला लाल गुलाब देऊन हा दिवस साजरा करतात.

स्वीडनमध्ये या दिवसाला अल जर्टन्स डॅग (फुल हार्ट डे) म्हणतात. फुल उद्योगाच्या व्यावसायिक हितसंबंधांमुळे आणि अमेरिकन सभ्यतेच्या प्रभावामुळे 1960 मध्ये स्वीडनला व्हॅलेंटाईन डे ची ओळख झाली. या दिवशी येथे अधिकृत सुट्टी दिली जात नाही. परंतु, उत्सव साजरा करण्यासाठी सर्व शासकीय कार्यालये बंद असतात.

फिनलंडमध्ये हा दिवस ‘स्तवानापाइवा’ म्हणून साजरा केला जातो. ज्याचे भाषांतर “मित्रांचा दिवस” ​​असे केले जाते. नावाप्रमाणेच, हा दिवस फक्त जोडीदारासाठी नव्हे तर सर्व मित्रांना लक्षात ठेवण्यासाठी साजरा करतात. एस्टोनियामध्ये व्हॅलेंटाईन डेला सोब्रापाईव्ह म्हणतात. ज्याचा अर्थ समान असा आहे. तर, वेल्समधील बरेच लोक 25 जानेवारीला व्हॅलेंटाईन डे ऐवजी डिड सँटिस ड्वेनवेन (सेंट ड्वेनवेन डे) साजरा करतात.

रोमानियामधील प्रेमींसाठी पारंपारिक सुट्टी म्हणजे ‘ड्रॅगोबीट’. जी 24 फेब्रुवारीला दिली जाते. रोमानियन लोककथेतील एका पात्राच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. या नावाचा एक भाग ड्रॅग (प्रिय) आहे तर दुसरा शब्द ड्रॅगोस्टे (प्रेम) असा आहे. हे दोन्ही शब्द मिळून ‘ड्रॅगोबीट’ हा शब्द तयार झालाय.

युगोस्लाव्हियामध्ये “सेंट व्हॅलेंटाईन मुळांना कळा आणतो” अशी म्हण आहे. म्हणून 14 फेब्रुवारीला या देशात द्राक्षबागा आणि शेतामध्ये काम सुरू केले जाते. असे म्हणतात की या दिवशी पक्षी एकमेकांशी लग्न करतात. म्हणूनच या दिवसाला वसंत ऋतुचा पहिला दिवस म्हणूनही संबोधले जाते.

ब्राझीलमध्ये Día dos Namorados म्हणजेच जोडणीचा दिवस किंवा बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड डे असे या दिवसाचे नाव आहे. पण, हा दिवस 12 जून रोजी साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे येथे साजरा केला जात नाही. याचे कारण मुख्यतः सांस्कृतिक आणि आर्थिक आहे. कारण, याच काळात ब्राझीलमधील प्रमुख सण कार्निव्हल येतो. हा ‘सेक्स’चा सण म्हणून ओळखला जातो. फेब्रुवार किंवा मार्चच्या सुरुवातीस कधीही हा सण येतो त्यामुळे इथे व्हॅलेंटाईन डे साजरा करत नाहीत.

जपानमध्ये 1960 मध्ये मात्र एक विशेष प्रथा आहे. 14 फेब्रुवारीला प्रत्येक कार्यालयातील महिला आपल्या सहकलाकारांना चॉकलेट देतात. पण, एक महिन्यानंतर म्हणजे 14 मार्चला ‘”रिप्लाय डे” साजरा केला जातो. या दिवशी पुरुष सहकारी महिला सहकारी यांना चॉकलेट देतात. त्या दिवशी किती चॉकलेट्स मिळाली यावरून त्या व्यक्तीची लोकप्रियता समजते.

दक्षिण कोरियामध्येही 14 फेब्रुवारीला स्त्रिया पुरुषांना चॉकलेट देतात आणि पुरुष 14 मार्चला त्यांना नॉन चॉकलेट कँडी देतात. ज्यांना या दोन्ही दिवशी काहीच मिळत नाही अशा व्यक्ती 14 एप्रिल हा काळा दिवस पाळतात. त्या दिवशी काळे नूडल्स खावून आपल्या एकाकीपणाचा “शोक” करण्यासाठी चीनी रेस्टॉरंटमध्ये जातात.

कोरियामध्ये प्रत्येक महिन्याची 14 तारीख ही प्रेमाशी संबंधित एक दिवस मानली जाते. जानेवारी ते डिसेंबर असे बारा महिने कँडल डे, व्हॅलेंटाईन डे, व्हाइट डे, ब्लॅक डे, रोज डे, किसिंग डे, सिल्व्हर डे, ग्रीन डे, म्युझिक डे, वाईन डे, सिनेमा डे आणि हग डे असे दिवस साजरे केले जातात.

फिलीपिन्समध्ये, व्हॅलेंटाईन डेला “Araw ng mga Puso” किंवा “हृदयाचा दिवस” ​​म्हणतात. तर, तुर्कीमध्ये व्हॅलेंटाईन डेला सेव्हगिलेर गुनु असे म्हणतात, ज्याचा अर्थ “प्रिय दिवस” ​​आहे. चिनी संस्कृतीमध्ये प्रेमींसाठी “द नाईट ऑफ सेव्हन्स” नावाचा जुना विधी आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.