AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंदेभारतमुळे बसला 6 हजारांचा फटका, असं काय घडलं की प्रवाशाचे झाले वांदे

वंदेभारतच्या वेगवेगळ्या बोगीत तीन टीटी आणि दोन महिला आणि दोन पुरुष रेल्वे कर्मचाऱ्यांना ही बाब सांगितली. परंतू वेळ निघून गेली होती.

वंदेभारतमुळे बसला 6 हजारांचा फटका, असं काय घडलं की प्रवाशाचे झाले वांदे
vande bharatImage Credit source: socialmedia
Updated on: Jul 20, 2023 | 2:15 PM
Share

भोपाळ | 20 जुलै 2023 : वंदेभारत ( Vande Bharat Express ) ही आधुनिक ट्रेन सध्या 25 राज्यात सुरु झाली आहे. ही ट्रेन भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन ( Semi Highspeed ) आहे. ट्रेनमधून वेगाने प्रवास करता येत असल्याने प्रवाशांची आवडती ट्रेन झाली आहे. या ट्रेनमधून आरामदायी प्रवास होत आहे. या ट्रेनचे अनेकांना आकर्षण आहे. परंतू एका प्रवाशासोबत विचित्र प्रकार घडला. तो घाई घाईत ट्रेनमध्ये चढला आणि त्याला सहा हजाराची फोडणी बसली कशी काय ते पाहा…

भारतीय रेल्वेवर प्रथम तेजस एक्सप्रेसमध्ये स्वयंचलित दरवाजे लॉंच करण्यात आले होते. हे दरवाजे आपोआप बंद होत असल्याने अनेकदा विचित्र प्रकार घडत असतात. त्याचे झाले काय सिंगरौली येथील बैढन येथे रहाणारे 42 वर्षीय अब्दुल कादिर यांची हैदराबादच्या बैगम बाजारात जाफरान हाऊसच्या नावाचे ड्रायफ्रुटचे दुकान आहे. 14 जुलै रोजी कादीर त्यांच्या पत्नी आणि आठ वर्षीय मुलासोबत दक्षिण एक्सप्रेसने हैदराबादहून सिंगरोली येथे निघाले होते. त्यांचे रिझर्व्हेशन सेंकड एसी कोचमध्ये होते. पण मध्येच घात झाला आणि त्याला नसती अवसदा सुचली.

कुटुंब जेवणासाठी खाली उतरले

15 जुलै रोजी सायं.5.20 वाजता ते भोपाळ स्थानकात पोहचले. रात्री 8.55 वाजता ट्रेन सिंगरौलीसाठी रवाना होणार होती. ट्रेन सुटायला दोन तासांहून अधिक वेळ होता. जास्त वेळ असल्याने त्यांचे कुटुंब जेवणासाठी खाली उतरले. अब्दुल यांना लघुशंका आल्याने ते दुसऱ्या फलाटावर उभ्या असलेल्या इंदौर जाणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये गेले. ते 7.24 वाजता आत शिरले. आणि ट्रेन 7.25 वाजता सुटली. ते घाबरले आणि टॉयलेटच्या बाहेर आले. तर दरवाजे लॉक झाले होते. ऑटोमेटिक दरवाजे असल्याने ते खोलता आले नाहीत. नंतर ही ट्रेन भोपाळहून रवाना झाली.

तिकीट तपासनीसांना भेटला

वंदेभारतच्या वेगवेगळ्या बोगीत तीन टीटी आणि दोन महिला आणि दोन पुरुष रेल्वे कर्मचाऱ्यांना ही बाब सांगितली. परंतू ट्रेनचे दरवाजे केवळ ड्रायव्हरच खोलू शकतो असे त्यांना सांगण्यात आले. टीटीने यावेळी त्याचं 1020 रुपयाच्या दंडासह त्यांचे तिकीट तयार केले. त्यानंतर ही ट्रेन 175 किमीवर उज्जैनला पोहचल्यावर त्यांना 750 रुपये बससाठी खर्च करावे लागले. इकडे त्यांच्या पत्नीने पती नसल्याने तीने सिंगरौलीला जाणारी दक्षिण एक्सप्रेस सोडून दिली. कादिर यांचे चार हजार रुपयांचे तिकीट वाया गेले. असा एकूण वंदेभारतच्या टॉयलेटमुळे त्याला एकूण सहा हजाराचा फटका बसला.

मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.