AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain: घड्याळात 4 वाजताच येथे सुरू होतो मुसळधार पाऊस, आजही चुकला नाही शिरस्ता, ही जागा कोणती?

4 O'Clock Rain: राज्यासह देशाला अलनिनो, सुपर अल निनोचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसात उन्हाचा पारा पार 46 अंशांच्या घरात गेलेला असतानाच आता पावसाची चाहुल लागली आहे. पण या ठिकाणी रोज न चुकता 4 वाजता पाऊस येतो. कोणते आहे हे ठिकाण?

Rain: घड्याळात 4 वाजताच येथे सुरू होतो मुसळधार पाऊस, आजही चुकला नाही शिरस्ता, ही जागा कोणती?
चार वाजेचा पाऊसImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 02, 2026 | 4:00 PM
Share

4 O’Clock Rain: अल निनो, सुपर अल निनोमुळे भारतात यंदा सूर्य आग ओकत आहे. राज्यात विदर्भासह अनेक भागात उष्णतेच्या झळांनी नागरीक हैराण झाले आहेत. तर त्यातच आता अवकाळी पाऊस येण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. पण जगातील या भागात पाऊस न चुकता 4 वाजता हजेरी लावतो, हे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. कोणते आहे हे ठिकाण?

पाऊस न चुकता येतो नियमित

जगाच्या काही भागात निसर्ग चमत्कार दाखवतो. काही भागात वाळवंट, तर काही भागात पाणीच पाणी, पण जगात असे ठिकाण आहे जिथे नियमित पाऊस पडतो. म्हणजे घड्याळात जेव्हा 4 वाजतात, तेव्हा या ठिकाणी पावसाला सुरुवात होते. या भागात तुम्ही दुपारी 3 वाजेनंतर गेलात तर तुम्हाला पावसाचा सामना करावा लागतो. हा निसर्गाचा चमत्कार अनुभवण्यासाठी मात्र मोठी कसरत करावी लागते.

कोणते आहे हे ठिकाण

भूमध्य रेखा पृथ्वीच्या मधोमध गेल्याचे मानले जाते. ती एक काल्पनिक रेषा आहे. पृथ्वीला दोन हिश्यात विभागते. उत्तर आणि दक्षिण गोलार्ध तयार होतो. याच पट्ट्यातील ॲमेझॉन आणि कांगो बेसिन या भागात चार वाजेच्या सुमारास थंडगार हवा सुरू होतात. एकाएक आभाळ भरून येते. काळे ढग पावसाचा सांगावा घेऊन येतात आणि पापणी लवते न लवते तोच पाऊस कोसळायला सुरुवात होते. संध्याकाळपर्यंत पावसाने हा प्रदेश रोज चिंब चिंब होतो. पावसाचं आणि इथल्या जंगलाचं जणू अतूट नातं आहे.

या प्रदेशात दोन गोष्टी अत्यंत खास आहे. या भागात सूर्य रोज कोपतो. तर दुपारनंतर पाऊस थंडावा देतो. सूर्याची किरणं थेट अंगाची लाहीलाही करतात. दिवसभर ऊन असते. तापमान वाढते. त्यामुळे समुद्रातील आणि नद्यातील पाण्याचे बाष्पीभवन होते. वाफ उंच जाते. पण उंचावर जाताच थंड वाऱ्यामुळे पाऊस पडायला सुरुवात होते. अगदी थोड्याच वेळात मुसळधार पाऊस पडतो. दुपारी 3 ते 5 या काळात पावसाचे आगमन होते. रोज येणाऱ्या या पावसाला ‘4 O’Clock Rain’ असे म्हटले जाते. भूमध्य रेषेच्या दोन्ही बाजूच्या प्रदेशात हा पाऊस अनुभवणे हे चमत्काराशिवाय कमी नाही.

Follow Us
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची...
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची....
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज.
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ.
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार.....
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार......
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात...
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात....
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....