AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal : शिवसेनेसारखाच ममता बॅनर्जींचा पक्ष फुटणार? किती आमदार, खासदार बंडाच्या तयारीत? भाजप नेत्याने आकडाच सांगितला

विधानसभा निवडणूक 2026 नंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय उलथापालथ सुरू आहे. भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी मोठा दावा केला आहे की, ५० टीएमसी आमदार आणि २० खासदार भाजपमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. टीएमसीमधील अंतर्गत नाराजीमुळे पक्षाला फुटीचा धोका आहे, तर टीएमसीने हा दावा फेटाळला आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय अनिश्चिततेचे वातावरण आहे.

West Bengal : शिवसेनेसारखाच ममता बॅनर्जींचा पक्ष फुटणार? किती आमदार, खासदार बंडाच्या तयारीत? भाजप नेत्याने आकडाच सांगितला
ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढणार का ?
| Updated on: May 27, 2026 | 9:16 AM
Share

विधानसभा निवडणूक 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये मोठा बदल पहायला मिळाला. या निवणुकीत भारतीय जनता पक्षाल बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळालं. तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाल्याने ममता बॅनर्जींचा सत्ता सोडावी लागली आणि भाजपचे सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तिथे झालेल्याया पक्षाचा उदय आणि नवा नेता, बदलती परिस्थिती दर्शवतो. मात्र पश्चिम बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) आता मोठा फटका बसताना दिसत आहे. कारण टीएमसीला त्यांचेच खासदार आणि आमदारांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. अवघ्या एका दिवसापूर्वीच, बारासातच्या खासदार काकोली घोष दस्तीदार आणि टीएमसीच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एका बैठकीला हजेरी लावली होती. याच दरम्यान आता भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि बांकुराचे खासदार सौमित्र खान यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे.

तर तृणमूलचं नामोनिषाण राहणार नाही

तृणमूलचे जवळपास 50 आमदार पक्षावर नाराज असून, 20 खासदार हे भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहेत, असा मोठा दावा भाजप नेते आणि बांकुराचे खासदार सौमित्र खान यांनी दावा केलाय. हे आमदार तसेच खासदार भाजपच्या संपर्कात असून, नेतृत्वाकडून मंजुरी मिळताच पक्ष बदलण्यास तयार आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जर शब्द दिला, तर टीएमसी नावाचा पक्षच अस्तित्वात राहणार नाही. प्रत्येकजण भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहे, असंही सौमित्र खान यांनी म्हटलं असून त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. टीएमसी फुटीच्या उंबरठ्यावर आहे का?, महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसेनेची अवस्था झाली, त्याप्रमाणेच ममता बॅनर्जी यांचा पक्ष फुटू शकतो की का?  ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढणार का,  अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

यावेळी सौमित्र खान यांनी टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. खान यांनी बॅनर्जींवा पापी असं संबोधत, पापी लोकांना तुरुंगात जायलाच लागतं, असंही ते म्हणाले. आज त्यांच्या घरासमोर बुलडोझर उभा आहे, असं खान म्हणाले. 2021 मध्ये त्यांनी (अभिषेक बॅनर्जी) भाजप कार्यकर्त्यांची घरे पाडली होती. पापी लोकांना त्यांच्या वागण्याचे परिणा तत्काळ भोगावे लागतात, त्यांनी नरकात जायला हवं अशा शह्दांत खांनी यांनी आपला संताप व्यक्त केला.

टीएमसीत अंतर्गत खदखद ?

पश्चिम बंगाल निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेस पक्षात अंतर्गत खदखद असून पक्षाला त्यांच्याच नेत्यांमधील असंतोषाचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान सौमित्र खान यांनी पक्षफुटीचा हा दावा केलायबारसातच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांना तृणूलने लोकसभेतील मुख्य प्रतोद पदावरून हटवले. त्यानंतर लगेचच केंद्र सरकारने काकोली यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा प्रदान केली. केवळ एक दिवस आधी, घोष यांनी तृणमूलच्या अर्धा डझन आमदारांसह मुख्यमंत्री सुवेंदू यांच्यासोबत एका प्रशासकीय बैठकीला हजेरी लावली होती.

तृणमूलने फेटाळला दावा

सौमित्र कान यांनी तृणमूलवर टीकास्त्र सोडलेलं असतानाच टीएमसीने मात्र खान यांचा दावा फेटाळला आहे. खान यांचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत टीएमसी खासदार सौगत रॉय यांनी तो फेटाळून लावला. सौमित्र खान आणि भाजप खोटी माहिती पसरवत आहेत, असं काहीही होणार नाही, अस ते म्हणाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तृणमूलचे अनेक खासदार, आमदार आणि नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 12 जागा तर तृणमूलने 29 जागा जिंकल्या. काँग्रेसला एक जागा मिळाली. आता, तृणमूलचे 20 खासदार पक्ष बदलण्यास तयार असल्याचा दावा करून सौमित्र खान यांनी टीएमसीचा तणाव वाढवला आहे. अपात्रता टाळण्यासाठी, पक्ष बदलणाऱ्या खासदारांची संख्या किमान 20 असणे आवश्यक आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप