AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today: TV9 भारतवर्षच्या ग्लोबल समिटमध्ये देश-विदेशातील दिग्गजांच्या विचारांची पर्वणी

TV9 भारतवर्षच्या ग्लोबल समिटच्या दुस-या दिवशी म्हणजे 18 जून रोजी तीन राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होतील. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड के संगमा आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या समिटमध्ये त्यांचे विचार मांडतील.

What India Thinks Today: TV9 भारतवर्षच्या ग्लोबल समिटमध्ये देश-विदेशातील दिग्गजांच्या विचारांची पर्वणी
टीव्ही 9 ग्लोबल समिटImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 12:41 PM
Share

भारताचे पहिल्या क्रमांकाचे न्यूज चॅनल TV9 भारतवर्ष (TV9 Bharatvarsh) 17 आणि 18 जून 2022 रोजी ग्लोबल समिट (Global Summit) आयोजीत करत आहे. या समिटचा विषय आहे, ‘What India Thinks Today‘. हे समिट नवी दिल्लीतील ताज पॅलेस (Taj Palace) येथे होईल. या कार्यक्रमाची सुरुवात TV9 नेटवर्कचे सीईओ बरुन दास (CEO Barun Das) हे करतील. ” भारत विश्व गुरु बनण्यापासून किती जवळ किती दूर?” या विषयावर चर्चेसाठी या समिटमध्ये चार मुद्यांवर चर्चा करण्यात येईल. पहिला मुद्दा राजकारण आणि प्रशासनाचा, दुसरा व्यापार आणि 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था (5 Trillion Economy) , तिसरा मुद्दा हा सामाजिक समरसता-स्वास्थ्य सेवा आणि चौथा मुद्दा हा खेळ आणि सिनेमा असा असेल. या सर्व मुद्यांवर या क्षेत्रातील देश-विदेशातील दिग्गज चर्चा करतील. या ग्लोबल समिटमध्ये पहिल्या दिवशी 6 केंद्रीय मंत्री तर दुस-या दिवशी म्हणजे 18 जून रोजी 9 केंद्रिय मंत्री सहभागी होतील. यासोबतच शेवटच्या दिवशी तीन राज्यांचे मुख्यमंत्री ही त्यांचे विचार मांडतील.

भारताचा सर्वात मोठा ग्लोबल फेस्ट

TV9 भारतवर्ष भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्लोबल फेस्ट आयोजीत करत आहे. ज्यात 20 कीनोट्स, 30 सत्र, 75 वक्ते आणि 20 थीम्स असतील. 17 जून 2022 रोजी या समीटमध्ये अफगाणिस्तानचे पूर्व राष्ट्रपती हामिद करजई (Hamid Karzai) ग्लोबल स्पीकर रुपात त्यांचे विचार मांडतील. त्यांच्यासोबत या विचारमंचावर प्रमुख वक्ते म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेचे (united nations general assembly) अध्यक्ष अब्दुल्ला शहीद (Abdulla Shahid) त्यांचे विचार मांडतील. समिटच्या दुस-या दिवशी 18 जून रोजी या कार्यक्रमात ब्रिटनचे पूर्व प्रधानमंत्री डेव्हिड कॅमेरुन (united kingdom david cameron) त्यांचे विचारपुष्प गुंफतील.

अनेक केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग

17 जून रोजी 6 केंद्रिय मंत्री या समिटमध्ये विचारपुष्प गुंफतील. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती ईराणी, कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी, जल शक्ती मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि कॅबिनेट मंत्री जी. किशन रेडडी यांचा समावेश असेल. तर दुस-या दिवशी 18 जून रोजी या समिट मध्ये एकूण 9 केंद्रीय मंत्री सहभागी होतील. 18 जून रोजी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे विचार मांडतील.

3 राज्यांच्या मुख्यमंत्र्याचा सहभाग

समिटच्या दुस-या दिवशी, 18 जून रोजी देशातील तीन राज्यांचे मुख्यमंत्री या समिटमध्ये सहभागी होतील. यामध्ये मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड के संगमा आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसरवराज बोम्मई त्यांचे विचार मांडतील.

सलग दोन दिवस दिग्गजांच्या विचारांची पर्वणी

17 जून ते 18 जून पर्यंत या ग्लोबल समिटमध्ये देशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या विचारांची पर्वणी असेल. यामध्ये आरिफ मोहम्मद खान, रणदीप सिंह सुरजेवाला, आनंद शर्मा, असुद्दीन ओवैसी, बाबा रामदेव, स्वामी चिदानंद सरस्वती, रमेश भाई ओझा, रविशंकर प्रसाद, संजीव मेहता, एसवीआर श्रीनिवास, गौतम बंबावाले, डॉ. सुधांशु त्रिवेदी, इला पटनायक, प्रशांत प्रकाश, एंड्रयू हॉलैंड, दीपक बागला, जोरावर दौलत, सारा स्टोरे, नाओर गिलोंन, अजीत रानडे, संजय बारु, लेफ्टनंट जनरल अता हसनैन, पंकज सरन, मोहम्मद अशरफ हैदरी, सुजान आर चिनॉय, डॉ. धीरज नय्यर, अरविंद मिल्लीगिरी, उमेश रेवंकर, राहुल गर्ग आणि फरीद मामुंडेज यांचा सहभाग आहे. 17 जून रोजी हे विचारवंत त्यांचे विचार मांडतील. तर 18 जून रोजी राघव चडडा, तेजस्वी सूर्या, अनुभव मोहंती, डॉ.संगिता रेडडी, शिवम पुरी, केवी विजेंद्र प्रसाद, पुलेला गोपीचंद, अंजू बॉबी जॉर्ज, विजेंद्र सिंह आणि भारतीय हॉकी टीमचे पूर्व कर्णधार दिलीप तिर्की हे सहभागी होणार असून त्यांचे विचार मांडतील.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.