नवी दिल्ली: आज बरोबर 75 वर्षापूर्वी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी राजधानी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली. त्यांच्या शरीरात तीन गोळ्या घुसल्या होत्या. पहिली गोळी शरीराला जोडणाऱ्या मणक्याच्या हड्डीच्या बाजूला साडे तीन इंच उजव्या बाजूला आणि बेंबीपासून अडीच इंच वर घुसली. दुसरी गोळी त्याच्या वर उजव्या बाजूला बरगड्यांमध्ये घुसली होती. तिसरी आणि शेवटची गोळी छातीत मणक्याच्या हाडापासून चार इंच उजव्या बाजूला लागून फुफ्फुसाला भेदून गेली होती.