मतदानाच्या निळ्या शाईचा इतिहास काय? नखालाच का लावतात ही शाई ? आणखी कोणत्या देशात मागणी ?
विधानसभा वा लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदान होेते. त्या मतदानानंतर सर्वजण हाताचे बोट दाखवत सेल्फी काढून आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मतदान केल्याची खूण म्हणून बोटांवर निळ्यारंगाची शाई लावली जाते. या शाईचा शोध कसा लागला, त्याचा इतिहास नेमका काय आहे ? पाहूयात...

देशाची राजधानी दिल्लीत नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणूकात आम आदमी पार्टीचा सफाया झाला असून २७ वर्षांनंतर भाजपा सत्तेत आली आहे. मतदानाचा पवित्र हक्क बजावताना नेहमी मतदात्यांच्या बोटांच्या नखाला एक विशिष्ट प्रकारचा शाई लावली जाते. या शाईचा नेमका काय इतिहास आहे. आधी बोटांना लावली जाणारी शाई नंतर नखांना का लावली जाऊ लागली या शाई मागचा इतिहास काय आहे ? जगातील कोण-कोणत्या देशात या शाईला मागणी आहे ते पाहूयात…. ब्रिटीशांकडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथम १९५१-५२ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक निवडणूका घेण्यात आल्या. त्यावेळी अनेकांना भलत्याच मतदार संघात मतदान केले. अनेक लोकांनी एकापेक्षा...