शरद पवारांच्या पोटात आत्ताच का दुखतंय, पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रात सत्तांतर? भाजप नेत्याचे वक्तव्य

शरद पवारांच्या पोटात आत्ताच का दुखतंय, पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रात सत्तांतर? भाजप नेत्याचे वक्तव्य
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

त्यांनी शरद पवार यांच्या तब्येत बिघडण्याचा थेट संबंध सचिन वाझे प्रकरणाशी जोडला आहे. | Shard Pawar hospitalized

Rohit Dhamnaskar

|

Mar 30, 2021 | 3:38 PM

नवी दिल्ली: शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर एकीकडे भाजपचे प्रमुख नेते फोन करुन त्यांची विचारपूस करत असताना दिल्ली भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल (Navin Kumar Jindal) यांनी मात्र पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येत बिघडण्याचा थेट संबंध सचिन वाझे प्रकरणाशी जोडला आहे. (BJP leader Navin Kumar Jindal take a dig at NCP cheif Sharad Pawar)

नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटते की, ‘दाल मे कुछ काला नही, पुरी दालही काली है’, असे नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच शरद पवार यांची ही पोटदुखी पाहता, पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल, असे वाटत असल्याची खोचक टिप्पणीही नवीन जिंदल यांनी केली.

आगे आगे देखो, होता है क्या, शरद पवार-अमित शाह भेटीवर भाजपच्या बड्या नेत्याचे रोखठोक वक्तव्य

महाविकासआघाडीचा प्रमुख आधारस्तंभ असलेले शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील चलबिचल वाढली आहे. अशा परिस्थितीत आता भाजपचे माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी नवे वक्तव्य करुन संभ्रम आणखीनच वाढवला आहे. (BJP leader Ram Shinde on Sharad Pawar and Amit Shah meet)

राम शिंदे यांनी मंगळवारी पंढरपुरात ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांना अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राम शिंदे यांनी, ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी मोघम पण सूचक प्रतिक्रिया दिली.

मी शक्यता व्यक्त करण्याइतका मोठा नेता नाही: चंद्रकांत पाटील

यूपीएच्या अध्यक्षपदावरून संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक वादावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. संजय राऊत हे चंद्र, सूर्य किंवा मंगळ अशा कोणत्याही विषयावर भाष्य करु शकतात, असे त्यांनी सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कालप्रमाणे शरद पवार आणि अमित शाह भेटीवर भाष्य करण्यास नकार दिला. तशा गोष्टी घडल्याच तर तुम्हाला आधी कळेल, असे मी बोललो होता. परंतु, कोणत्याही शक्यता व्यक्त करण्याइतका मी मोठा माणूस नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन

राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. अनेकांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या: 

शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन

पवार-शहा भेट झालीच नाही, अफवांची धुळवड थांबवा; संजय राऊतांचं ट्विट

अमितजींचा निर्णय मान्य, काही ठरलंच तर पहाटेच्या शपथविधीसारखं झाल्यावर कळेल: चंद्रकांत पाटील

(BJP leader Navin Kumar Jindla take a dig at NCP cheif Sharad Pawar)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें