Bullet Train: बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली सर्वात मोठी अपडेट
केंद्र सरकारचा महत्त्वाच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यानचा हा रेल्वेमार्ग विकसित भारताकडे एक पाऊल असणार आहे. अशातच आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

केंद्र सरकारचा महत्त्वाच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यानचा हा रेल्वेमार्ग विकसित भारताकडे एक पाऊल असणार आहे. अशातच आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सुरत आणि बिलीमोरा दरम्यानचा 50 किलोमीटरचा पहिला टप्पा 2027 मध्ये सुरु होणार असं वैष्णव यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचा संपूर्ण मार्ग 2029 पासून सुरु होईल असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.
रेल्वेमंत्र्यांनी बुलेट ट्रेनबद्दल बोलताना सांगितले की, ‘बुलेट ट्रेन सुरु झाल्यानंतर मुंबई आणि अहमदाबादमधील अंतर फक्त दोन तास आणि सात मिनिटांत गाठता येणार आहे. भारताच्या या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.’ आज वैष्णव यांनी सुरत रेल्वे स्थानकाची पाहणी केली. स्टेशनच्या बांधकामाव्यतिरिक्त वैष्णव यांनी ट्रॅकच्या कामाचीही पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.
2029 पर्यंत देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, ‘पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला 50 किलोमीटरचा सुरत ते बिलीमोरा दरम्यानचा टप्पा 2027 पर्यंत सुरु होईल. यासाठी तयारी सुरु आहे. 2028 पर्यंत हा ठाणे-अहमदाबाद हा विभाग कार्यान्वित होईल आणि 2029 पर्यंत संपूर्ण मुंबई-अहमदाबाद पूर्ण प्रकल्प सुरु होईल. या मार्गावर ताशी 320 किमी वेगाने ट्रेन धावू शकणार आहे.’
Bharat’s bullet train project is advancing rapidly with the world’s most modern technology.
📍HSR Surat Station pic.twitter.com/j3zrFwiPKo
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 27, 2025
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
रेल्वेमंत्र्यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘सुरक्षित आणि कार्यक्षम रेल्वे वाहतूकीसाठी हा मार्ग तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा करण्यात येत आहे. मार्गावर अनेक व्हायब्रंट सिस्टीम बसवण्यात आली आहे, जेव्हा ट्रेन 320 किमी/तास वेगाने प्रवास करेल तेव्हा युटिलिटी केबल कंपन शोषून घेईल, ज्यामुळे ट्रेन सुरक्षितपणे धावेल.’
ट्रॅकसाठी खास सिस्टीम
ट्रॅकमधील व्हायब्रेशनवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जोरदार वारे किंवा अचानक भूकंप आल्यावरही ट्रेन पूर्णपणे स्थिर राहावी यासाठी काही फीचर्स जोडण्यात आले आहेत. त्यामुळे कोणतीही आपत्ती आली तरी ट्रेनमधील प्रवाशांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
