Monsoon | मान्सून तो आरेला है बॉस… पण राज्यात सर्वाधिक पाऊस कुठे होतोय माहितीय का?

Monsoon | मान्सून तो आरेला है बॉस... पण राज्यात सर्वाधिक पाऊस कुठे होतोय माहितीय का?

आता चार महिने बरसणारा पाऊस हा काही सर्वत्र सम प्रमाणातच पडेल असे नाही. अनिश्चित आणि अनियमित हेच या मान्सूनचे वेगळेपण आहे. पण राज्यातील पर्वतरांगा ह्या मान्सूनची दिशा आणि दशा बदल्याची भूमिका पार पाडतात. नैऋत्य मोसमी वारे समुद्राकडून वाहत असताना पर्वतरांगाचा अडथळी निर्माण झाल्यास त्याच ठिकाणी अधिकचा पाऊस पडतो. अशा ठिकाणावरच वसलेल्या या आंबोली गावातच सर्वाधिक पाऊस पडतो.

राजेंद्र खराडे

|

May 25, 2022 | 6:18 AM

मुंबई : आतापर्यंत (Monsoon Rain) मान्सूनचा अंदाज, त्याचे भारतामध्ये आगमन केव्हा होणार ? पर्जन्य कसे राहणार याबाबत सर्वकाही माहिती अगदी शेतकऱ्यांपर्यंत देखील पोहचलेली आहे. कारण याच मान्सूनच्या पावसावर सर्वकाही अवलंबून आहे. देशातील शेती व्यवसाय असो की उद्योग व्यवसाय याचा संबंध प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मान्सूनशी आलेला आहेच. यंदाची सुखद बाब म्हणजे मान्सून वेळेवर तर दाखल होणार आहेच शिवाय सरासरी एवढ्या प्रमाणात बरसणार देखील आहे. हे झाले आगमनाबद्दलपर्यंत पण (Maharashtra) राज्यात सर्वाधिक पाऊस कुठे बरसत असेल असा सवाल या पावसाळ्यात किमान एकदा तरी आपल्या मनात येतोच. त्याची उत्सुकता ही असतेच. तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या (Amboli) आंबोली या निसर्गसंपन्न गावात होतो. या ठिकाणी वर्षाकाठी तब्बल 7 हजार 500 मिमी पाऊस पडतो. आंबोली हे गाव जगातील काही मोजक्या जैवविविधता केंद्रांपैकी एक आहे. इथे पावसामध्ये सतत पर्यटकांची रीघ लागलेली असते.

आंबोलीतच सर्वाधिक पाऊस का?

आता चार महिने बरसणारा पाऊस हा काही सर्वत्र सम प्रमाणातच पडेल असे नाही. अनिश्चित आणि अनियमित हेच या मान्सूनचे वेगळेपण आहे. पण राज्यातील पर्वतरांगा ह्या मान्सूनची दिशा आणि दशा बदल्याची भूमिका पार पाडतात. नैऋत्य मोसमी वारे समुद्राकडून वाहत असताना पर्वतरांगाचा अडथळी निर्माण झाल्यास त्याच ठिकाणी अधिकचा पाऊस पडतो. अशा ठिकाणावरच वसलेल्या या आंबोली गावातच सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे पर्याटनाच्या दृष्टीनेही याला वेगळच महत्व आहे. वर्षभरामध्ये या सह्याद्रीच्या घाटावरील गावात तब्बल 7 हजार 500 मिमी पाऊस बरसत असल्याची नोंद आहे.

आंबोली गाव आहे तरी कुठे?

आंबोली गाव हे सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. आंबोली घाटामुळेच या गावाला आंबोली हे नाव पडलेले आहे. गोवा आणि कर्नाटक राज्यांपासून पण जवळ आहे. इथे वर्षाकाठी सरासरी 7 हजार 500 मिमी पाऊस पडतो. पावसामध्ये सदैव धुक्याची चादर ओढून असणारे आणि अनेक जातीच्या दुर्मिळ प्राणी पक्ष्यांचे वास्तव्य असणारे आंबोली हे गाव जगातील काही मोजक्या जैवविविधता केंद्रांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील महत्वाचा असा हा घाटमार्ग असून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या या घाट मार्गातून प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

हे सुद्धा वाचा

पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू

पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणाऱ्या या घाटामध्ये हे गाव वसलेले आहे. पावसाला सुरवात झाली की, येथील धबधबे ओसंडून वाहतात. तसेच नांगरतास धबधबा, घनदाट जंगल , हिरण्यकेशी नदीचा उगम, महादेव मंदिर, सनसेट पॉईंट, कावळेशेत पॉईंट इत्यादी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. हे सर्व पाहण्यासाठी आंबोली घाटात पर्यटकांची खूप गर्दी असते. आंबोली घाटातील रस्ता नागमोडी वळणाचा आहे. तसेच आंबोली घाटाला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणून सुद्धा ओळखले जाते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें