AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचा कोणता नेता सर्वाधिक आवडतो? नरेंद्र मोदी की… राहुल गांधी यांचे खास उत्तर, Video शेअर करत सांगितले कारण

Rahul Gandhi Favorite BJP Leader: भाजपविरोधात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दंड थोपाटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन गदारोळाने भरून गेले आहे. पण भाजपमधील हा नेता राहुल गांधी यांना आवडतो. कोण आहे हा नेता?

भाजपचा कोणता नेता सर्वाधिक आवडतो? नरेंद्र मोदी की... राहुल गांधी यांचे खास उत्तर, Video शेअर करत सांगितले कारण
राहुल गांधी
| Updated on: Aug 07, 2026 | 9:33 AM
Share

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एक मिष्कील प्रश्न विचारण्यात आला. त्यांना भाजपचा कोणता नेता सर्वाधिक आवडतो? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्याचे उत्तरही त्यांनी दिले. इन्स्टाग्रामवर एका युझरने काँग्रेस नेत्याला हा प्रश्न विचारला. त्यांचा आवडता राजकीय नेता कोण आहे? भाजपमधील कोणता नेता आवडतो? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. अनेकांना ते कोणाचे नाव घेतात याची उत्सुकता होती. उत्तराचा व्हिडिओ सुद्धा राहुल गांधी यांनी शेअर केला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह आवडते नेते

राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे. त्यानुसार, कॅप्टन अमरिंदर सिंह हे त्यांचे आवडते नेते आहेत. त्यांच्यासोबत आपण अनेक वर्ष काम केले. ते अत्यंत शांत, कूल आहेत. त्यांचा लष्करासंबंधीही दांडगा अनुभव आहे. त्यामुळे मी त्यांना पसंत करतो. ते माझे आवडते नेते आहेत. या व्हिडिओच्या शेवटी ते एक हास्य करत म्हणतात की, हॅलो अंकल अमरिंदर… कॅप्टन अमरिंदर सिंह हे दोनदा पंजाबचे मुख्यमंत्री होते. ते अगोदर काँग्रेस पक्षात होते. आता ते भारतीय जनता पक्षासोबत आहेत.

अमरिंदर सिंह यांनी 2021 मध्ये काँग्रेस पक्ष सोडला होता. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी 27 ऑक्टोबर 2021 रोजी नवीन पक्ष पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर 19 सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी हा पक्ष भाजपमध्ये विलीन केला. ते अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल झाले. पुढील वर्षी पंजाब विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी नेमके आताच त्यांचे आवडते नेते म्हणून उल्लेख करणे हा मोठा राजकीय संकेत मानल्या जात आहे.

राहुल गांधींना Gen-Z ने काय विचारले?

राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर Ask Me Anything असे सत्र सुरू केले होते. त्यांनी यामध्ये विद्यार्थी आणि Gen-Z शी संवाद साधला. अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले. ते या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. त्यांना पाळीव प्राण्याविषयी विचारण्यात आले. मुक्या जीवांना सन्मानाने राहण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी यावेळी सोनिया गांधी यांचा कुत्राही यावेळी दाखवला. तुम्ही बॅटमॅन आहात का? असा प्रश्न राहुल गांधी यांना एका युझरने विचारला. त्यावर मी आणि बॅटमन अद्याप एकत्र दिसलेलो नाही असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.

राहुल गांधी हे सातत्याने सरकारला घेरताना दिसत आहेत. पावसाळी अधिवेशनात त्यांनी CJP आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यावरून संसदेत सरकारची कोंडी केल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला कोणी केला. त्याचे आदेश कोणी दिले याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहाला देण्याची मागणी लावून धरली आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची संसदेत येण्याची हिम्मत नसल्याची टीकाही त्यांनी केली. पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक दिसले आहेत. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांची भेट घेत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...