मुख्यमंत्री बनण्यासाठी हत्तीची सवारी, ते टॉस उडवून शिक्षकांची निवड, कोण आहेत पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी?

58 वर्षांचे चन्नी हे रामदसिया शिख समिदायातून येतात. अमरिंदर सिंह सरकारमध्ये तंत्र आणि शिक्षण मंत्री होते. ते रुपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब विधानसभा क्षेत्रातून आमदार होते. 2007 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले.

मुख्यमंत्री बनण्यासाठी हत्तीची सवारी, ते टॉस उडवून शिक्षकांची निवड, कोण आहेत पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी?
Charanjit Singh Channi

चंदिगढ: पंजाब काँग्रेसमध्ये (Punjab Congress) आधी वाद झाले नंतर कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी राजीनामा दिला आणि आता दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना पक्षाचा विधायक दलाचा नेता निवडण्यात आलं आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट झालं आहे की, चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील. पंजाबचे ते पहिले दलित नेते असतील, ज्यांना मुख्यमंत्रिपदावर बसण्याचा मान मिळणार आहे. 58 वर्षांचे चन्नी हे रामदसिया शिख समिदायातून येतात. अमरिंदर सिंह सरकारमध्ये तंत्र आणि शिक्षण मंत्री होते. ते रुपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब विधानसभा क्षेत्रातून आमदार होते. 2007 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग ते निवडून येत आहे. शिरोमणी अकाली दल आणि भाजपच्या युतीच्या सरकारमध्ये ते विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. ( Who exactly is Charanjit Singh Channi, the new Chief Minister of Punjab, replacing Capt. Amarinder Singh? )

वरिष्ठ सरकारी पदांवर अनूसुचित जातीच्या लोकांना प्रतिनिधित्त्व न मिळणं यासारख्या गोष्टींवर चन्नी यांनी सरकारवर वेळोवेळी टीक केली आहे. त्यांचा राजकीय प्रवास 2002 मध्ये खरार नगर परिषदेच्या अध्यक्षपदापासून सुरु झाला होता. 2007 मध्ये चन्नी यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि ते चमकौर साहिब विधानसभा क्षेत्रातून निवडूनही आले. 2012 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्याच जागेवरुन पुन्हा निवडून आले.

IAS अधिकाऱ्याला मेसेज पाठवण्याचा वाद

मंत्री म्हणून चन्नी हे वादात तेव्हा सापडले जेव्हा भारतीय प्रशासनिक सेवा म्हणजेच एका महिला IAS अधिकाऱ्याने त्यांच्यावर चुकीचा मेसेज पाठवण्याचा आरोप केला. यानंतर महिला आयोगाने पंजाब सरकारला जाब विचारला होता. यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी चन्नी यांनी माफी मगायला लावली होती, आणि हे प्रकरण आता संपल्याचं घोषित केलं होतं.

टॉस करुन पद वाटप

2018 मध्ये चन्नी पुन्हा एकदा वादात सापडले. तेव्हा त्यांनी एका पॉलिटेक्निक संस्थेवर लेक्चरर म्हणून काम करणाऱ्याच्या निवडीसाठी चक्क 2 उमेदवारात टॉस उडवला होता. रुपया उडवून छापा-काटा करत त्यांनी या संस्थेवर लेक्चररची नियुक्ती केली. हे सगळं प्रकरण कॅमेऱ्यात कैद झालं. यानंतर कॅप्टन अमरिंदर सरकारला याचं उत्तर देता देता नाकीनऊ आले.

मुख्यमंत्री बनण्यासाठी हत्तीची सवारी

चन्नी आणि वाद हे समीकरणच झालेलं आहे. एकदा चन्नी यांनी आपल्या सरकारी बंगल्याबाहेर रस्ता तयार केला. जेणेकरुन त्यांना बंगल्यात पूर्वेकडून प्रवेश करता येईल. शिरोमणी अकाली दल आणि भाजपच्या सरकारमध्ये चन्नी हे विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी त्यांनी राजकारणात यशस्वी होण्यासाठी चक्क हत्तीची सवारी केली होती. त्यांना ज्योतिषीने त्यावेळी सांगितलं होतं की, असं केलं तर तुम्ही पंजाबचे नवे मुख्यमंत्री होणार.

पॅचवर्कबद्दलचं वक्तव्य आणि पीएचडीचा वाद

चन्नी ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते, तेव्हा तत्कालिन उपमुख्यमंत्री सुखबीस सिंह बादल यांनी चन्नी यांना विचारलं होतं, की 2002 ते 2007 दरम्यान जेव्हा कॅप्टन अमरिंदरसिंह यांचं सरकार होतं, तेव्हा त्यांनी काय केलं? यावर उत्तर देताना, चन्नी म्हणाले होते की त्यांनी सगळ्या पंजाबमध्ये पॅचवर्क केलं. हेच नाही तर चन्नी हे पीएडचीच्या एन्ट्रंसलाही बसले होते. चन्नी एन्ट्रस देत आहेत, म्हणून विद्यापीठाने SC-ST उमेदवारांना जास्त सवलती दिल्या असा आरोप त्यावेळी झाला. मात्र चन्नी ही एन्ट्रस परीक्षा पास होऊ शकले नाहीत.

हेही वाचा:

आप, बसपा-अकाली दलाला रोखण्यासाठी काँग्रेसची खेळी?; दलित व्होटबँक खेचणार?; कोण आहेत चरणजीतसिंग चन्नी?

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसकडून दलित नेत्याला संधी, चरणजितसिंह चन्नींच्या नावाची घोषणा

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI