Devendra Fadnavis : ते तर जनतेलाही माहीत, आसामसह पाच राज्यांच्या निवडणूक काँग्रेस जिंकणार? मुख्यमंत्र्यांचा मोठा बॉम्बगोळा, काय काढला चिमटा?

Devendra Fadnavis on Congress: तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस खातं उघडणार का? आसाम दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा काढला चिमटा? काँग्रेस प्रत्युत्तर देणार?

Devendra Fadnavis : ते तर जनतेलाही माहीत, आसामसह पाच राज्यांच्या निवडणूक काँग्रेस जिंकणार? मुख्यमंत्र्यांचा मोठा बॉम्बगोळा, काय काढला चिमटा?
देवेंद्र फडणवीस, काँग्रेस
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 31, 2026 | 11:58 AM

Devendra Fadnavis on Congress: देशातील केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना काँग्रेसची या निवडणुकीत काय कामगिरी असेल या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी बॉम्ब गोळा टाकला. त्यांनी काँग्रेसवर तोफ डागली. तर यावेळी भाजप आसाममध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकांना माहिती आहे काँग्रेस निवडून येणार नाही

मी तर असं मानतो सारे रेकॉर्ड तोडून बीजेपी आसाम मध्ये जिंकेल. मोदी यांचे नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री यांनी कार्य केले आहे पॉझिटिव्ह व्हेव दिसत आहे. काँग्रेसच्या घोषणा पत्राचा काही एक असर होणार नाही. यापूर्वी महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा कुठेच असर झाला नाही. लोकांना माहीत आहे हे निवडून येणार नाही. काँग्रेसलाही माहित आहे ते निवडून येणार नाही ते लोकांना प्रॉमिस करत आहे आम्ही प्रत्येकाला ताजमहल बांधून देऊ, असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला. वास्तविकता लोकांनी बघितली आहे. कसा विकास होतो बघितला आहे. काँग्रेसवर कोणाचा भरोसा नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नक्षलवादाचा बिमोड केला

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अभिनंदन करतो . नक्षलवादाच्या विरुद्ध त्यांनी लढाई लढली. मी ज्या राज्यातून येतो महाराष्ट्र तो राज्य सर्वात मोठा नक्षल तो राज्य सर्वात मोठा पीडित नक्षलवाद राज्य होतं. मोदी आणि अमित शहा यांच्यामुळे पूर्ण नक्षलवाद मिटवून टाकला आहे. गडचिरोलीमध्ये कोणी पाय ठेवू शकत नव्हतं. सर्वात मोठा स्टील सिटी बनत आहे. लोकांचा विश्वास प्राप्त कराल तर लोक भरभरून मतदान करतात. काँग्रेसने एकाप्रकारे लोकांचा विश्वास तोडला आहेय काँग्रेस लोकांमध्ये विश्वास पैदा करू शकत नाही म्हणून काँग्रेसला मतदान मिळत नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

गॅसची कमतरता नाही

आपल्या आजूबाजूचे देशांनी लॉकडाऊन केला आहे. कोणी दोन आठवडे तीन आठवडे तर चार आठवडे लॉक डाऊन केला आहे. भारताच्या जनजीवनावर कुठे परिणाम झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस पण पेट्रोल डिझेलची कमतरता भासू दिली नाही. डोमेस्टिक गॅसची पण कमतरता भासू दिली नाही. कमर्शियल गॅस 70% पर्यंत रिस्टोर आहे. करण्याचा काम पंतप्रधान यांनी केले आहे. संकटाच्यावेळी काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Follow Us