AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये परत जावं लागणार? अखेर पोलिसांनी दिलं उत्तर

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश जारी झाल्यानंतर सीमा हैदर प्रकरण चर्चेत आहे. खरच सीमाला भारत सोडून पाकिस्तानला जावे लागणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर आता पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये परत जावं लागणार? अखेर पोलिसांनी दिलं उत्तर
Seema HaidarImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 29, 2025 | 12:19 PM
Share

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत लोकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांना आता नोएडा पोलिसांनीही उत्तर दिलं आहे. सीमा हैदरच्या पाकिस्तानात परतण्याबाबत पोलिसांचं म्हणणं आहे की, केंद्र सरकारकडून जो आदेश येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल.

सीमा हैदर यांचे वकील एपी सिंह यांनी सांगितलं की, या प्रकरणात केंद्र सरकार आणि यूपी पोलिसांकडून सीमाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. त्यांचं म्हणणं आहे की, सीमा सध्या कोर्टाच्या आदेशानुसार रबूपुरा गावात राहत आहे. त्यांनी असंही सांगितलं की, सीमा हैदर प्रकरणाची चौकशी यूपी एटीएसनेही केली होती, ज्यात त्यांना काहीही आढळलं नव्हतं. या प्रकरणात आता नोएडा पोलिसांनीही सांगितलं आहे की, सीमाबाबत त्यांच्याकडे कोणताही आदेश आलेला नाही. हे प्रकरण कोर्टात आहे. जो आदेश येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. वाचा: भारतासोबत युद्ध होणार असल्याचे कळताच पाकिस्तानी नागरिकांचा आनंद गगनात मावेना, कारण वाचून व्हाल थक्क

पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांकडे विनंती

22 एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवला होता, त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलत सार्क व्हिसा सवलत धोरणांतर्गत त्यांच्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा बंद केल्या. भारत सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला. याच दरम्यान सीमा हैदरबाबतही लोकांचं लक्ष तिच्यावर आहे. दरम्यान, सीमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे विनंती करत सांगितलं की, ती आता भारताची सून आहे. तिला येथेच राहण्याची परवानगी द्यावी.

सीमा बेकायदेशीरपणे भारतात आली होती

पाकिस्तानची रहिवासी असलेल्या सीमा हैदरने यूपीच्या नोएडा येथील रहिवासी सचिन मीणा यांच्याशी लग्न केलं आहे. दोघांची ओळख पबजी गेम खेळताना झाली होती. सीमा विवाहित आहे आणि तिला चार मुलं आहेत. ती आपल्या मुलांना घेऊन पाकिस्तानातून नेपाळला पोहोचली आणि तिथून बेकायदेशीरपणे मे 2023 मध्ये भारतात प्रवेश केला. ती आपल्या चारही मुलांना घेऊन आली होती. येथे येऊन तिने सचिनशी हिंदू रीति-रिवाजांनुसार लग्न केलं. नुकतंच त्यांना एक मूलही झालं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.