आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंबद्दल महत्वपूर्ण निर्णय; दिल्ली पोलिसांनी प्रकरणाचा सगळा इतिहास सांगितला…

ज्या वेळी क्रीडा मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी सांगितले की, 15 जूनपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर खेळाडूंनी क्रीडा मंत्र्यांकडे आपल्यावर नोंद करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.

आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंबद्दल महत्वपूर्ण निर्णय; दिल्ली पोलिसांनी प्रकरणाचा सगळा इतिहास सांगितला...
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 11:48 PM

नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या कुस्तीपटूने भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. या खेळाडूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  कुस्तीपटूंनी 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभादिवशीच जंतरमंतरहून संसद भवनाच्या दिशेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.

त्या गोंधळानंतर पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते. त्याचवेळी या आंदोलनातील कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र आता दिल्ली पोलिसांकडूनच दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत.

देशात हुकूमशाही आहे का?

ज्या कुस्तीपटूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांचा त्या गुन्ह्यामध्ये समावेश आहे. कुस्तीपटूंविरुद्ध गुन्हा दाखल केल्या नंतर ब्रिज भूषण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवायला पोलिसांना सात दिवस लागले होते. याविषयी बोलताना कुस्तीपटूंनी सांगितले की, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आमच्यासारख्या खेळांडूंविरुद्ध मात्र गुन्हा नोंदवायला सात तासही लागले नाहीत. त्यामुळे देशात हुकूमशाही आहे का? असा सवाल खेळाडूंनी उपस्थित केला होता.

देशाच्या इतिहासात नोंद

त्यामुळे हे सरकार खेळाडूंबरोबर कशा पद्धतीने वागणूक देत आहे, त्याची या देशाचा इतिहास नोंद घेईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. बजरंग पुनियांनी गुन्हा दाखल झाल्यानंतरची परिस्थित सांगताना म्हणाले की, पोलिसांनी मला त्यांच्या कोठडीत ठेवले होते. मात्र त्यावेळी ते काहीच सांगत नव्हते.

क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंविरुद्ध भादंवि कलम 147, 149, 186, 188, 322 आणि 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर एफआयआर रद्द करण्याची मागणी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे करण्यात आली होती. ज्या वेळी क्रीडा मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी सांगितले की, 15 जूनपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर खेळाडूंनी क्रीडा मंत्र्यांकडे आपल्यावर नोंद करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.