AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पंतप्रधान आम्हाला घाबरतात, त्यांना हे शोभत नाही’, ‘आंदोलनजीवी’वरुन योगेंद्र यादवांचा घणाघात

राजकीय विश्लेषक आणि शेतकरी आंदोलनात अग्रेसर असलेले योगेंद्र यादव यांनी आंदोलनजीवी शब्दावरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

'पंतप्रधान आम्हाला घाबरतात, त्यांना हे शोभत नाही', 'आंदोलनजीवी'वरुन योगेंद्र यादवांचा घणाघात
| Updated on: Feb 08, 2021 | 11:48 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला आणि त्यावरुन आता देशभरात राजकारण तापलं आहे. राजकीय विश्लेषक आणि शेतकरी आंदोलनात अग्रेसर असलेले योगेंद्र यादव यांनी आंदोलनजीवी शब्दावरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. योगेंद्र यादव एका फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी स्वत: काही दिवसांपूर्वी जनआंदोलनाबाबत बोलत होते. काँग्रेस विरोधात ते जनआंदोलन करण्याची भाषा करत होते. मात्र, आता त्यांना आंदोलन खटकत आहे’.(Yogendra Yadav’s reply to Prime Minister Narendra Modi’s criticism)

‘कधी-कधी वाटतं की पंतप्रधान मोदींना काँग्रेसची खरी गरज आहे. जर काँग्रेस राहिली नाही तर पंतप्रधानांचं काय होईल?’, असंही यादव यांनी म्हटलंय. दुसऱ्यांच्या आधारावर जगणाऱ्याला परजीवी म्हणतात. पंतप्रधान मोदी यांनी आज एक नवा शब्द जन्माला घातला आहे. तो म्हणजे आंदोलनजीवी. ‘त्यावर पंतप्रधान मोदी आम्हाला घाबरत आहेत. ते खूप मोठ्या खुर्चीवर बसले आहेत. अशावेळी त्यांना अशा पद्धतीचे बोल शोभा देत नाहीत’, अशी टीका योगेंद्र यादव यांनी केली आहे.

‘हो मी आंदोलनजीवी’

‘हो मी आंदोलनजीवी आहे. कारण भारताला स्वातंत्र्य एका आंदोलनामुळेच मिळालं आहे. या देशानं अनेक मोठे आंदोलनं पाहिले आहेत. त्या आंदोलनाच्या माध्यमातूनच परिवर्तन आलं आहे. काँग्रेस काळात पंतप्रधान मोदीच जनआंदोलनाची गोष्ट करत होते. पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरुन त्यांच्या पक्षानंही आंदोलनं केली होती’, असं प्रत्युत्तर यादव यांनी दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यावर आपली भूमिका व्यक्त केली. तसेच देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी हसता हसता सांगितलं. काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत. देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात, अशी शब्दांत उपद्रव निर्माण करणाऱ्यांचा मोदींनी समाचार घेतला.

संबंधित बातम्या : 

श्रमजीवी, बुद्धिजीवी ऐकले होते, आता आंदोलनजीवी अशी नवी जमात आलीय: मोदी

PM Modi Speech : मोदी है मौका लिजिए, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे

Yogendra Yadav’s reply to Prime Minister Narendra Modi’s criticism

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....