नवाब मलिकांची फर्जीवाड्याविरोधातील लढाई नव्या वर्षातही सुरुच! भाजपकडून मलिकांवर जोरदार निशाणा

नवाब मलिकांची फर्जीवाड्याविरोधातील लढाई नव्या वर्षातही सुरुच! भाजपकडून मलिकांवर जोरदार निशाणा
मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा भाजपचा दावा

नवाब मलिक 1 जानेवारीला म्हणाले आणि 2 जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी NCB आणि समीर वानखेडेंना घेरलं. ड्रग्ज प्रकरणात, नवाब मलिकांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांची सप्टेंबरमध्ये जामिनावर सुटका झाली. मात्र हा जामीन रद्द करण्यासाठी NCBनं हायकोर्टात धाव घेतलीय. त्यावरुन मलिकांनी NCBच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 02, 2022 | 9:46 PM

मुंबई : नव्या वर्षातही फर्जीवाड्याविरोधात लढाई सुरु राहिल, असं अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) 1 जानेवारीला म्हणाले आणि 2 जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी NCB आणि समीर वानखेडेंना (Sameer Wankhede) घेरलं. ड्रग्ज प्रकरणात, नवाब मलिकांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांची सप्टेंबरमध्ये जामिनावर सुटका झाली. मात्र हा जामीन रद्द करण्यासाठी NCBनं हायकोर्टात धाव घेतलीय. त्यावरुन मलिकांनी NCBच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

मलिकांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लीपही सार्वजनिक केलीय. NCB जुन्या पंचनाम्यात बदल करण्यासाठी पंचावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप मलिकांनी केलाय.

‘वानखेडेंना मुदतवाढ देण्यासाठी भाजप नेता प्रयत्नशील’

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी फर्जीवाडा करणारा व चुकीच्या पद्धतीने लोकांना अडकवणारा अधिकारी असल्याचा अहवाल दिला आहे. असं असतानाही भाजपाचा राज्यातील एक मोठा नेता त्याला पुन्हा मुदतवाढ मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृहविभागाकडे प्रयत्नशील आहे, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केलाय. तसंच समीर वानखेडे यांना मुदतवाढ द्या. त्यामुळे खंडणी वसूल करण्याच्या खेळात कोण कोण सहभागी आहेत हे उघड करण्याची संधी मिळेल, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.

‘समीर खान विरोधात अपील दाखल करुन प्रसिद्धीचा खेळ सुरु’

मुख्य आरोपी करन सजलानी आहे. याशिवाय सहा आरोपी या प्रकरणात आहेत. करन सजलानी याच्या ताब्यातून माल एनसीबीने ताब्यात घेतला. त्याविरोधात अपील नाही. फर्नीचरवालाच्या विरोधात अपील नाही. मात्र समीर खानच्या विरोधात अपील दाखल करुन प्रसिद्धीचा खेळ सुरु आहे. आम्ही न्यायालयीन लढाई न्यायालयात लढू. आम्ही हे प्रकरण क्वॅश करण्यासाठी हायकोर्टात दाखल केले आहे. हायकोर्टात कागदपत्रात असल्याचे सांगितले जात आहे की, 84 किलो सोकॉल्ड पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये आले आहे.

..पण मी घाबरणार नाही- मलिक

याच एजन्सीने लोअर कोर्टात 1 किलो 101 ग्रॅम असल्याचे लिहून दिले आहे. परंतु न्यायाधीशांनी मानले नाही, फक्त 60 ग्रॅम प्रकरण होते. फर्जीवाड्याची मर्यादा एनसीबीने पार केली आहे. जर एनसीबी प्रोफेशनल एजन्सी आहे तर एकट्या समीर खानच्याविरोधातच का? हे त्यांना सांगावे लागेल असेही नवाब मलिक म्हणाले. मला घाबरवण्यासाठीच असा प्रकार एनसीबी करत असेल तर मी घाबरणार नाही. जे नियम तोडून काम करत आहेत त्यांच्याविरोधात माझा लढा सुरूच राहणार असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

अमृता फडणवीसांचा मलिकांवर निशाणा

तर इकडे नवाब मलिकांवर अमृता फडणवीसांनी कोरोनावरुन शेरोशायरी ट्विट करुन टीका केलीय…या ट्विटमध्ये मलिकांचा उल्लेख पुन्हा एकदा बिगडे नवाब केलाय.

गेल्या वर्षी मलिकांनी समीर वानखेडेंवर चौफेर टीका केली होती…समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावर मलिकांनी आक्षेप घेतलाय…आणि नव्या वर्षातही आरोपांची मालिकांनी सुरुच ठेवलीय.

इतर बातम्या :

Maharashtra Corona update : राज्यातला आजचा कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ, 11 हजार 877 नवे रुग्ण

वाह काय टायमिंग! बरोबर अखेरच्या दिवशी जत्रा रद्द, अंधेरीतील मालवणी जत्रा रद्द करण्यामागच्या राजकारणाची बातमी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें