वाह काय टायमिंग! बरोबर अखेरच्या दिवशी जत्रा रद्द, अंधेरीतील मालवणी जत्रा रद्द करण्यामागच्या राजकारणाची बातमी

वाह काय टायमिंग! बरोबर अखेरच्या दिवशी जत्रा रद्द, अंधेरीतील मालवणी जत्रा रद्द करण्यामागच्या राजकारणाची बातमी
अंधेरीतील मालवणी जत्रोत्सव रद्द

शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या मालवणी जत्रोत्सवाला तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे शिवसेनेवर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. या टीकेनंतर अखेर मालवणी जत्रोत्सवाच्या आयोजकांना जाग आली आणि शेवटच्या दिवशी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 02, 2022 | 9:17 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतोय. ओमिक्रॉनच्या (Omicron) फैलावही मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी करु नका आणि कोरोना नियम पाळा असं आवाहन राज्य सरकारमधील नेते, मंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांकडूनच कोरोना नियम (Corona Guidelines) पायदळी तुडवले जात असल्याचा प्रकार अंधेरीमध्ये पाहायला मिळाला होता. शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या मालवणी जत्रोत्सवाला तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे शिवसेनेवर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. या टीकेनंतर अखेर मालवणी जत्रोत्सवाच्या आयोजकांना जाग आली आणि शेवटच्या दिवशी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या करोनच्या कडक निर्बंधांमुळे मुंबईतील अंधेरी पश्चिम इथली मालवणी जत्रोत्सव शेवटच्या दिवशी रद्द करण्यात आलीय. मालवणी जत्रोत्सवात कोरोनाचे प्रोटोकॉल तोडले गेले, असा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला होता. त्यामुळे शिवसेनेने आयोजित केलेल्या मालवणी जत्रोत्सवाचे आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप आमदारांनी केली होती. मात्र. आम्ही कोणताही राज्य सरकारचा कोरोना निर्बंधचा प्रोटोकॉल तोडला नसल्याचं स्पष्टीकरण या जत्रोत्सवाच्या आयोजकांनी दिलं आहे.

कोरोना नियमांची पायमल्ली

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत डी एन नगर पोलीस स्टेशन समोरच्या मुंबई महानगरपालिकेच्या मैदानामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून ‘मालवणी जत्रोत्सव’चे आयोजन करण्यात आलं होतं. या जत्रोत्सवात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये लोकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

आयोजकांवर कारवाईची भाजपची मागणी

राज्यात 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनला बंदी घालण्यात आली आहे. मग शिवसेनेच्या जत्रोत्सवाला परवानगी कशी काय? असा सवाल विचारला जात आहे. तसेच हा जत्रोत्सव अंधेरी पोलीस स्टेशनसमोरच आयोजित करण्यात आला आहे. मॉलसारख्या ठिकाणी महापौरांकडून पाहणी दौरा आयोजित केला जात आहे. मग या ठिकाणी महापौर का येत नाहीत? असाही प्रश्नही विचारण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती.

मुंबईत आज 8 हजारापेक्षा अधिक रुग्ण

आज मुंबईत तब्बल 8 हजार 63 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. कालही मुंबईत 6 हजार 347 रुग्ण आढळून आले होते, गेल्या काही दिवसात थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा आकडेवारी वाढल्याने धाकधूक वाढली आहे. यात एक दिवलासादायक बाबा म्हणजे आजही एकाही कोरोनाबाधिताचा मुंबईत मृत्यू झाला नाही.

इतर बातम्या :

Maharashtra Corona update : राज्यातला आजचा कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ, 11 हजार 877 नवे रुग्ण

Omicron Variant : चिंता वाढली, राज्यात ओमिक्रॉनचे 50 नवे रुग्ण, एकट्या पुण्यात 36 रुग्णांची नोंद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें