AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार, नारायण राणे पुन्हा आमने-सामने; सरकार पडणार म्हणाऱ्यांमध्ये राणेंची भर, पवारांनी लगावला टोला

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरून राणे आणि अजित पवारांमध्ये सुरु झालेली शाब्दिक चकमक काही थांबताना दिसत नाहीये. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवताच, राणेंनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं होतं. आता भाजपाचा मुख्यमंत्री असेल असे राणे यांनी म्हटले होते. यावर अजित पवारांनी आता राणेंना आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिले आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट.

अजित पवार, नारायण राणे पुन्हा आमने-सामने; सरकार पडणार म्हणाऱ्यांमध्ये राणेंची भर, पवारांनी लगावला टोला
Ajit Pawar, Narayan Rane.
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 10:16 PM
Share

सिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत, महाविकास आघाडीच्या पॅनलचा पराभव करताच, राणेंनी थेट राज्य सरकारलाच आव्हान दिलं होतं. महाविकास आघाडीला लगानची टीम म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसवणार, अशा शब्दात राणेंनी सरकारला डिवचलं होतं. मात्र आता राणेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. सरकार पडेल हे सांगणाऱ्यांमध्ये राणेंची नवी भर पडली आहे. अशा खोचक शद्बांमध्ये पवारांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

यापूर्वी आले आमने-सामने

दरम्यान अजित पवार आणि नारायण राणे आमने-सामने येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वी देखील अनेकदा पवार आणि राणे यांचा सामना झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निमित्तानं मतदाना आधीही अजित पवार आणि राणे आमनेसामने आले होते. बँका उभ्या करायला अक्कल लागते, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना राणेंनी अक्कल असणाऱ्यांकडेच जिल्हा बँक आली, असा पलटवार राणेंनी केला होता.

सामनातून नारायण राणेंवर निशाणा

राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक विजयाचा सामनामधून देखील समाचार घेण्यात आला होता. राणे यांनी एक जिल्हा बँक काय जिंकली तर महाराष्ट्र गदागदा हलवायची भाषा सुरु झाली. भारतीय जनता पक्षाला वरातीत नाचायला आणि दु:खात रडायला भाडोत्री लोक लागतात. असे लोक मिळाले की ते आनंदाने बेहोश होतात. सिंधुदुर्गात तेच घडले. कोकणात आजही लोक भुताखेतांच्या गोष्टीत रमतात, पण त्या अनेकदा भाकडकथाच असतात. एका जिल्हा बँकेवर विजय मिळवताच राज्यात सत्ता परिवर्तन होईल, अशी बोंब मारणे यास भाकडकथा नाही म्हणायचे तर दुसरे काय ? असा सवाल सामनामधून उपस्थित करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

Maharashtra Corona Update : आमदार रोहित पवार आणि आमदार धिरज देशमुखही कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती स्वस्थ

नवी मुंबईतील 500 चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता करात सूट मिळणार, सिडकोने प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याची एकनाथ शिंदेंची सूचना

मुख्यमंत्री म्हणाले, ‘आदित्यने माझा ताण कमी केला’, तर भाजप नेते म्हणतात ‘तुमचा कमी झाला पण जनतेचा वाढला’!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली