भगवान गड आणि गोपीनाथ गड बाबत माहीत आहे का?; वाचा, स्पेशल स्टोरी

दसऱ्याच्या दिवशी होणारे राज्यातील चार मेळावे अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा. दुसरा म्हणजे नागपूरच्या रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा. (who was shree sant bhagwan baba? know brief history)

भगवान गड आणि गोपीनाथ गड बाबत माहीत आहे का?; वाचा, स्पेशल स्टोरी
bhagwanbaba

बीड: दसऱ्याच्या दिवशी होणारे राज्यातील चार मेळावे अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा. दुसरा म्हणजे नागपूरच्या रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा. तिसराही नागपूरच्याच दीक्षाभूमीवरील आंबेडकरी जनतेचा धर्मांतर सोहळ्याचा मेळावा आणि चौथा म्हणजे भगवान गडावर होणारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. या चारही मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जातं. त्यातही भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवान गडावरील मेळाव्यावरून झालेल्या वादानंतर भगवान गड अधिक चर्चेत आला. भगवान गडचा इतिहास नेमका काय आहे? भगवानबाबा कोण होते? यावर टाकलेला हा प्रकाश.

गडाला नाव कसं पडलं?

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सावरगाव आहे. या ठिकाणी भगवानगड आहे. भगवान बाबांच्या नावाने हा गड ओळखला जातो. या ठिकाणी भगवान बाबा वास्तव्याला होते. या गडाला पूर्वी धौम्यगड किंवा धुम्यागड म्हणूनही ओळखलं जायचं. मात्र, भगवानबाब या ठिकाणी वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी या जीर्ण गडाची डागडूजी सुरू केली. त्यामुळे या गडाला भगवानबाबांच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर 1958 मध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या गडाचं उद्घाटन करण्यात आलं होतं.

bhagwan baba

bhagwan baba

कोण होते भगवान बाबा?

भगवानबाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. ते मूळचे सावरगाव घाट येथील. त्यांनी या धौम्यगडावर येऊन सातत्याने कीर्तन, प्रवचन केले. या ठिकाणीच त्यांनी दिंडी सोहळ्यांना सुरुवात केली. त्यामुळे धौम्यगड हा बीड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आला. भगवानबाबांचे निधन 1965 साली झाले. त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली. त्यानंतर 2003 पासून नामदेव महाराज शास्त्री हे गडाचं काम पाहत आहेत.

bhagwan baba

bhagwan baba

ऊसतोड कामागारांचं श्रद्धापीठ

भगवानगड हा ऊसतोड कामगारांचं श्रद्धापीठ आहे. तसेच वंजारी समाजाचं धार्मिकस्थळ आहे. राज्यातील सुमारे 45 मतदारसंघात भगवानगडाचे भक्त राहतात. भगवानगडावर पूर्वीपासून लोक येत होते. मात्र, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भगवानगड अधिक चर्चेत आले. गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात जसजसा उदय झाला तस तसं मुंडेंमुळे भगवानगडाचा लौकीकही वाढला.

bhagwan baba

bhagwan baba

दसरा मेळाव्याची परंपरा

भगवान गडावरील मेळाव्याला 50 वर्षाची परंपरा आहे. स्वत: गोपीनाथ मुंडे 35 वर्ष हा मेळावा घेत होते. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवानबाबांनी पहिला दसरा मेळावा घेतला होता.

bhagwan baba

bhagwan baba

वाद काय?

गोपीनाथ मुंडे हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळावा साजरा करायचे. 1994पासून त्यांनी ही परंपरा सुरू केली. अनेक वर्ष त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली. मुंडे यांच्या निधानानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली. मात्र, 2016मध्ये या मेळाव्याला वादाचे गालबोट लागले. गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी हा मेळावा घेण्यास नकार दिला. त्यामुळे वाद झाला. मात्र, त्यानंतरही पंकजा यांनी पाथर्डी येथील भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन जनतेला संबोधित केलं. मात्र, 2017मध्ये दसरा मेळावा कुठे घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मस्थळी म्हणजे पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. सावरगाव घाट हे भगवानगडापासून 50 किलोमीटरवर आहे. पंकजांनी या ठिकाणाहून नव्या परंपरेला सुरुवात केली.

असं आहे स्मारक

सावरगाव हे भगवानबाबांचं जन्मगाव. या गावी अडीच एकरामध्ये भगवानबाबांचे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्यांच्या जुन्या वाड्याची डागडूजी करण्यात आली. समाधी मंदिरही तयार करण्यात आलं. अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी भगवानबाबांची 25 फुटांची मूर्ती बनवली. पंकजा मुंडे यांनी सावरगावात दुसरा भगवान भक्तीगड निर्माण केला. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडाचा विकास केला, तर पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मभूमीच्या विकासाकडे लक्ष दिले आहे. या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भव्य व्यासपीठही उभारले आहे. 2017पासून या नव्या भगवान भक्तीगडावर त्यांनी दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. मात्र, गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडित झाली. पंकजा मुंडे यांना ऑनलाईन मेळावा घ्यावा लागला होता.

bhagwan baba

bhagwan baba

भगवान गड आणि गोपीनाथ गडात फरक काय?

भगवानगड हे वारकरी संप्रदायाचं अत्यंत पवित्र स्थान आहे. भगवानगड हा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात खरवंडी येथे आहे. म्हणजे बीड आणि अहमदनगरच्या सीमेवर हा गड आहे. तर भगवान भक्तीगड हा बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे आहे. गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यावर परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 18 एकर जागेवर गोपीनाथ गड उभारण्यात आला. या परिसरात गोपीनाथ मुंडेंचा पूर्णकृती पुतळाही उभारण्यात आला. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते हा गोपीनाथ गडाचं लोकार्पण करण्यात आलं होतं.

 

संबंधित बातम्या:

कोणत्याही मंत्रिपदावर नाही याचं दु:ख नाही, त्याची आठवणही काढत बसत नाही; पंकजा मुंडेंचा टोला कुणाला?

उद्याचा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीचा, वर्गाचा नाही, हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा मेळावा: पंकजा मुंडे

उद्याचा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीचा, वर्गाचा नाही, हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा मेळावा: पंकजा मुंडे

(who was shree sant bhagwan baba? know brief history)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI