AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील या बाप्पाला गोड गणपती का म्हणतात? कसं पडलं हे नाव? काय आहे परंपरा? जाणून घ्या A टू Z माहिती

मुंबईतील अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाचा गणपती "गोड गणपती" म्हणून प्रसिद्ध आहे. या नावामागची कहाणी एका भक्ताच्या नवसाला जोडलेली आहे. त्याने बाप्पावर साखरेचा वर्षाव केला, आणि ही परंपरा आजही चालू आहे.

| Updated on: Aug 11, 2025 | 7:49 AM
Share
मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. अनेक मोठमोठ्या गणपती मंडळांचे आगमन सोहळे थाटामाटात पार पडताना दिसत आहेत. त्यातच आज मुंबईच्या गिरगावातील अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा पार पडला.

1 / 8
अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाच्या आगमन सोहळ्यासाठी हजारो भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९७८ मध्ये झाली. यंदा या गणेशोत्सवाचे 48 वे वर्ष आहे.

अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाच्या आगमन सोहळ्यासाठी हजारो भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९७८ मध्ये झाली. यंदा या गणेशोत्सवाचे 48 वे वर्ष आहे.

2 / 8
अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ हे त्यांची अनोखी परंपरा आणि भव्यतेमुळे प्रसिद्ध आहे. या मंडळाची मूर्ती दरवर्षी मूर्तिकार सिद्धेश नामदेव दिघोळे यांच्याकडून तयार केली जाते. 
या मंडळाच्या गणपतीला प्रेमाने गोड गणपती म्हणून ओळखले जाते.

अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ हे त्यांची अनोखी परंपरा आणि भव्यतेमुळे प्रसिद्ध आहे. या मंडळाची मूर्ती दरवर्षी मूर्तिकार सिद्धेश नामदेव दिघोळे यांच्याकडून तयार केली जाते. या मंडळाच्या गणपतीला प्रेमाने गोड गणपती म्हणून ओळखले जाते.

3 / 8
पण या गणपतीला गोड गणपती हे नाव कसं पडलं, त्यामागचे कारण काय याबद्दल आज आपण जाणून घेऊया. अखिल चंदनवाडीच्या गणपती बाप्पाला गोड गणपती हे नाव पडण्यामागे एक खास प्रथा कारणीभूत आहे. ज्याची सुरुवात भक्तांच्या श्रद्धेतून सुरू झाली.

4 / 8
काही वर्षांपूर्वी एका भक्ताने आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी या बाप्पाकडे नवस केला होता. त्याचा तो नवस पूर्ण झाल्यावर त्याने गणपती बाप्पाला साखर अर्पण करण्याचे वचन दिले होते. त्या भक्ताचा नवस पूर्ण झाला. त्यानंतर त्याने नवस बोलल्याप्रमाणे बाप्पावर साखरेचा वर्षाव केला.

5 / 8
ही घटना पाहून इतर भाविकांनीही याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. यानंतर मग ही प्रथा हळूहळू लोकप्रिय झाली. याच परंपरेमुळे या गणपतीला गोड गणपती असे नाव पडले आहे.
साखरेचा वर्षाव करण्याच्या प्रथेवर काही जणांनी आक्षेप घेतला होता.

ही घटना पाहून इतर भाविकांनीही याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. यानंतर मग ही प्रथा हळूहळू लोकप्रिय झाली. याच परंपरेमुळे या गणपतीला गोड गणपती असे नाव पडले आहे. साखरेचा वर्षाव करण्याच्या प्रथेवर काही जणांनी आक्षेप घेतला होता.

6 / 8
पण मंडळाने यावर एक छान उपाय शोधून काढला. जे भक्त गणपती बाप्पाच्या चरणी साखर अर्पण करतात, तेव्हा ती सर्व साखर उधळली जात नाही. त्यातील थोडी साखर ही गुलालात मिक्स केली जाते. यानंतर विसर्जनावेळी बाप्पावर त्याचा वर्षाव केला जातो.

7 / 8
यानंतर बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली साखर दुसऱ्या दिवशी नारळासोबत चंदनावाडीतील रहिवाशांना प्रसाद म्हणून वाटली जाते. यामुळे, भक्तांच्या श्रद्धेचा आदर राखला जातो आणि साखरेचा सदुपयोगही होतो. ही परंपरा प्रसिद्धीसाठी नसून, केवळ भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.

8 / 8
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.