BJP Leader Daughter : दिल्ली पोलिसांनी भाजप नेत्याच्या मुलीलाही सोडलं नाही, सीजेपी कार्यकर्त्यांसहित तिलाही घेतलं ताब्यात
दिल्लीत सीजेपी आंदोलनात सहभागी होणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे. दिल्लीत पोलिसांनी भाजपच्या माजी आमदाराच्या मुलीलाही देखील ताब्यात घेतलं.

Image Credit source: टीव्ही9 मराठी
d
- दिल्लीतील जंतर-मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून देशात वातावरण तापलं आहे. निवडणूक आयोगाच्या आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. सीजेपीच्या प्रमुखांना ताब्यात घेतल्यानंतरही कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे.
- ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या सीजेपी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. या आंदोलनात एका भाजप नेत्याच्या मुलीनेही सहभाग नोंदवला होता. तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
- उत्तर प्रदेशच्या फतेहपूरचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी राजे सिंह हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. याआधी तिने सीजेपी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. यशस्विनी आणि कार्यकर्ते दिल्लीच्या बंगला साहिब जवळ एका पार्कात बसले होते.
- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोनलाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
- अभिजीत दिपके, सौरभ दास, आशुतोष रांका यांच्यासहित 2000 हून अधिक आदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यशस्विनी सिंह राजे हिला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.
Follow Us





