शोरुमची काच फोडून कार पहिल्या मजल्यावरुन थेट खाली

पनवेलमधील खांदा कॉलनी परिसरात शोरुमच्या पहिल्या मजल्याची काच फोडून कार थेट रस्त्यावर कोसळली

  • मेहबूब जमादार, टीव्ही9 मराठी, रायगड
  • Published On - 11:38 AM, 10 Dec 2019
1/6
चित्रपटांमध्ये शोभेल असा थरारक प्रकार पनवेलमध्ये पाहायला मिळाला. शोरुमच्या पहिल्या मजल्यावरुन कार चक्क खाली कोसळली.
2/6
पनवेलमधील खांदा कॉलनी परिसरात हायवे शेजारी असलेल्या किआ कंपनीच्या शोरुममध्ये हा प्रकार घडला.
3/6
शोरुमच्या पहिल्या मजल्याची काच फोडून कार थेट रस्त्यावर कोसळली. ही घटना आज (मंगळवार 10 डिसेंबर) सकाळी घडली.
4/6
सुदैवाची गोष्ट म्हणजे गाडीतील ड्रायव्हर या घटनेत सुखरुप आहे. चालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.
5/6
पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळे गाडीचा पुढील भाग चेपला गेला. तर शोरुम आणि गाडीच्या काचांचा तुकडे खाली उभ्या असलेल्या इतर गाड्यांवर उडाले
6/6
चालकाचा पाय अॅक्सलरेटरवर पडल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शोरुम प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे.