Chanakya Niti : श्रीमंत व्हायचंय? चाणक्यांनी सांगितलेले 3 नियम लक्षात ठेवा; अन्यथा सगळं गमावून बसाल!

आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी आणि आयुष्य सुखात जगण्यासाठी एक मोलाचा सल्ला दिलेला आहे. तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे टाळा असे चाणक्य यांनी सांगितलेले आहे. कमाईपेक्षा तुमचा खर्च जास्त असेल तर तुम्ही भविष्यात संकटात सापडू शकता.

| Updated on: Feb 28, 2026 | 10:08 PM
1 / 5
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात खूप श्रीमंत व्हावसं वाटतं. पण प्रत्येकाच्याच हे जमत नाही. काही लोक श्रीमंत होतातही परंतु चुकीच्या सवयीमुळे कमावलेली सगळी संपत्ती गमावून बसतात. त्यामुळे श्रीमंत होण्याआधी आयुष्यात जगण्याचे हे नियम माहिती असणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांनी हे निमय सांगितलेले आहेत.

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात खूप श्रीमंत व्हावसं वाटतं. पण प्रत्येकाच्याच हे जमत नाही. काही लोक श्रीमंत होतातही परंतु चुकीच्या सवयीमुळे कमावलेली सगळी संपत्ती गमावून बसतात. त्यामुळे श्रीमंत होण्याआधी आयुष्यात जगण्याचे हे नियम माहिती असणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांनी हे निमय सांगितलेले आहेत.

2 / 5

आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्यासाठी आणि आयुष्य सुखात जगण्यासाठी एक मोलाचा सल्ला दिलेला आहे. तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे टाळा असे चाणक्य यांनी सांगितलेले आहे. कमाईपेक्षा तुमचा खर्च जास्त असेल तर तुम्ही भविष्यात संकटात सापडू शकता. त्यामुळे हा नियम पाळणे गरजेचे आहे.

3 / 5

आयुष्यात पैसे कमवताना कमाईचा मार्ग कोणता आहे, हे समजून घ्या. चुकीच्या मार्गाने कधीच पैसे कमवू नये असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले. वाममार्गाने कमावलेल्या संपत्तीमुळे समाधान लाभत नाही. मानसिक शांतीही नाहीशी होते. प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचतो.

4 / 5

आयुष्यात कितीही कमाई केली तरीही पैसे उडवताना काळजी घेणे गरजेचे आहे. आयुष्यात संकट कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा स्थितीत तुमच्याकडे पैसे असणे गरजेचे आहे. कमाईचा काही हिस्सा तुम्ही जपून ठेवणे गरजेचे आहे.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us