Baap Beep Baap : ‘बाप बीप बाप’मधून सुटणार वडील-मुलाच्या नात्यातील गुंता?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 22, 2021 | 9:50 AM

अमित कान्हेरे यांनी हा विषय अतिशय छान पद्धतीने हाताळला आहे. थोडेसे अबोल, संकोच असलेले हे नाते उगीचच गंभीर न करता अतिशय गोड आणि हलक्या फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले आहे. (Baap Beep Baap: Will the father-son relationship get stronger after 'Baap Beep Baap' web series)

Aug 22, 2021 | 9:50 AM
वडील -मुलाचे नाते हे नेहमीच तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. मुलाची आईसोबत जितकी जवळीक, मैत्रीपूर्ण नाते असते, तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो. एकमेकांमध्ये सुसंवाद नसतो, अनेकदा एकमेकांविषयी प्रेम असूनही ते व्यक्त करण्यासाठी दोघेही संकोच करतात.

1 / 5
अशाने त्यांच्या नात्यातील दरी अधिकच खोल होत जाते. अशा या गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य करणारी 'बाप बीप बाप' वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर 31 ऑगस्टपासून आपल्या भेटीला येत आहे.

2 / 5
नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून वडील - मुलाचे अवघड नाते यात दिसत आहे. लॉकडाऊन आधी कधीच एकत्र वेळ न घालवलेल्या वडील-मुलाला जेव्हा लॉकडाऊनमुळे नाईलाजास्तव एकमेकांबरोबर वेळ घालवावा लागतो तेव्हा नक्की काय होते? या काळात नात्यातील संवाद गवसतो का? त्यांच्या नात्याचा हा गुंता सुटतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वरील 'बाप बीप बाप' मध्ये मिळणार आहेत.

3 / 5
अमित कान्हेरे यांनी हा विषय अतिशय छान पद्धतीने हाताळला आहे. थोडेसे अबोल, संकोच असलेले हे नाते उगीचच गंभीर न करता अतिशय गोड आणि हलक्या फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले आहे.

4 / 5
या वेबसीरिजचे लेखन प्रतिक उमेश व्यास आणि अमित कान्हेरे यांनी केले असून संवाद योगेश जोशींनी लिहिले आहेत तर छायाचित्रणाची धुरा विशाल सांघवाई यांनी सांभाळली आहे.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI