Photo : ‘मेरी माँ…’ मराठमोळ्या कलाकारांचं ‘मदर्स डे’ सेलिब्रेशन, शेअर केले खास फोटो

आज मदर्स डे त्यामुळे आज सगळेच आपल्या आईबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. (‘Meri Maa…’ ‘Mother’s Day’ celebration of Marathi artists, shared special photo)

1/8
Marathi Actress
आज मदर्स डे या निमित्त आज सगळेच जण आपल्या आईबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. त्यात तुमचे लाडके कलाकारही मागे नाहीयेत. सकाळपासूनच सोशल मीडियावर त्यांनी फोटो शेअर करायला सुरुवात केलीये.
2/8
Hemant Dhome
अभिनेता हेमंत ढोमेनं त्याच्या आईसोबतचा हा सुंदर फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
3/8
Siddharth Jadhav
तर महाराष्ट्राचा लाडका सिद्धार्थ जाधवनं हा सुंदर फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
4/8
Sayali Sanjeev
सध्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडत असलेली अभिनेत्री सायली संजीवनं हा गोड फोटो शेअर करत आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
5/8
Gayatri Datar
अभिनेत्री गायत्री दातारनं आईसोबतचा हा जुना फोटो शेअर करत आईला शुभेच्छा दिल्या आहेत.
6/8
Shiv Thakre
तर महाराष्ट्राच्या लाडक्या शिवनंसुद्धा सोशल मीडियावर मस्त फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
7/8
Rupali Bhosale
आई कुठे काय करते मालिकेतील संजना अर्थात अभिनेत्री रुपाली भोसलेनं आईला मिठी मारलेला हा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
8/8
Spruha Joshi
तर मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीनंसुद्धा आई आणि सासू बाईंसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.