विवाहित असून पार्टनरपासून वेगळे राहतात हे बॉलिवूड सेलिब्रिटी
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी जोडपं आहेत, जे विवाहित असूनही एकमेकांपासून वेगळे राहतात. या जोडप्यांनी घटस्फोट घेतला नसला तरी ते एकमेकांसोबत एकाच घरात राहत नाहीत. या यादीत अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजाचाही समावेश आहे.

गोविंदा-सुनिता अहुजा, ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चनImage Credit source: Instagram
- गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की ती गोविंदासोबत एकाच घरात राहत नाही. हे दोघं वेगवेगळ्या घरात राहतात. “आमची दोन घरं आहेत. त्यापैकी एक अपार्टमेंट आणि एक बंगला आहे. अपार्टमेंटमध्ये मी आणि माझी मुलं राहतो, तर समोरच्या बंगल्यात गोविंदा एकटाच राहतो”, असं तिने सांगितलं.
- अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहेत. अशातच ऐश्वर्या अभिषेकसोबत ‘जलसा’ या बंगल्यात राहत नसल्याचं वृत्त आहे. मुलगी आराध्यासोबत ती वेगळ्या घरात राहत असल्याचं कळतंय.
- दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नीतू कपूर यांच्यात खूप भांडणं व्हायची. त्यामुळे दोघंही वेगवेगळ्या घरात राहायचे. ‘टाइम्स नाऊ’ने यासंदर्भातील वृत्त दिलं होतं. एका मुलाखतीत रणबीर कपूरसुद्धा आईवडिलांच्या भांडणांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता.
- अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनीसुद्धा एकत्र राहत नाहीत. धर्मेंद्र यांनी विवाहित असताना हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही. ते आजही पहिली पत्नी प्रकाश कौर आणि मुलांसोबत वेगळ्या घरात राहतात.
- अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांचे आईवडीलसुद्धा एकत्र राहत नाहीत. बबिता कपूर आणि रणधीर कपूर यांच्या नात्यात एकेकाळी बराच दुरावा निर्माण झाला होता. तेव्हापासून हे दोघं वेगवेगळे राहत आहेत.