Marathi News » Photo gallery » Genelia Deshmukh Before acting, actress Genelia D'Souza Deshmukh was an expert in sports
Genelia Deshmukh :अभिनयापूर्वी , खेळात निष्णात होती अभिनेत्री जेनेलिया डिसूजा-देशमुख
तुझे मेरी कसम' चित्रपटादरम्यान जेनेलिया आणि रितेश एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जवळपास 9 वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. जेनेलिया आणि रितेश यांना दोन मुलेही आहेत. आज त्यांचे नाव बॉलीवूडच्या क्यूट कपलमध्ये येते.
हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. जेनेलिया डिसूजाचा जन्म 5ऑगस्ट 1987 रोजी मुंबईत झाला. जेनेलिया ही मराठी भाषिक मँगलोरियन कॅथोलिक कुटुंबातून आली आहे.
1 / 5
अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत रितेश देशमुख होता. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी जेनेलिया मॉडेलिंग करायची.
2 / 5
हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त जेनेलियाने तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. जेनेलिया अभ्यास, अभिनयासोबतच खेळातही निष्णात होती. ती एके काळी राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू राहिली आहे.
3 / 5
अमिताभ बच्चन यांच्यासोबत पार्कर पेनच्या जाहिरातीमुळे ती प्रसिद्ध झाली. यानंतर त्यांनी इतर अनेक जाहिरात चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी जेनेलिया फक्त 15 वर्षांची होती.
4 / 5
'तुझे मेरी कसम' चित्रपटादरम्यान जेनेलिया आणि रितेश एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जवळपास 9 वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. जेनेलिया आणि रितेश यांना दोन मुलेही आहेत. आज त्यांचे नाव बॉलीवूडच्या क्यूट कपलमध्ये येते.