AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : तिकडे इस्त्रायल-इराणमध्ये युद्धविराम; सोने-चांदी ग्राहकांवर मेहरबान! भाव गडगडले

Jalgaon Sarafa Market Gold And Silver Price : ग्राहकांसाठी सलग दुसर्‍या दिवशी आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. मध्य-पूर्वेत इराण आणि इस्त्रायलमध्ये शांतता करार होताच, इकडे सोने आणि आणि चांदीने लोटांगण घेतले आहे. भाव इतके घसरले आहेत.

| Updated on: Jun 25, 2025 | 11:38 AM
Share
काल 12 दिवसांच्या संघर्षानंतर इस्त्रायल आणि इराण यांनी शस्त्रसंधी केली. युद्ध विरामावर दोन्ही देश राजी झाले. अनेक देशातील शेअर बाजार तेजीत आले तर सोने-चांदीतील गुंतवणूक कमी झाली. दोन्ही धातुचे भाव उतरले आहेत.

1 / 6
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दोन्ही धातुने अक्षरशः लोटांगण घेतले आहे. किंमती कमी झाल्याने ग्राहकांची पावले बाजाराकडे वळली आहे. सराफा बाजारात खासा गर्दी दिसत आहे.

2 / 6
सोन्याचे दर  २ हजार रुपये तर चांदीचे दर १ हजाराने घसरले आहेत. जळगाव सराफा बाजारात सोने जीएसटीसह १ लाख ३२२ रुपये तोळा तर चांदी १ लाख ०९ हजार १८० रुपये किलोवर आली आहे.

3 / 6
सोन्याने चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या खिशावरील ताण कमी झाला आहे. या वर्षी सोन्याचा तोरा वाढला आहे. सोन्याने लाखाचा उंबराठा ओलांडल्याने अनेक ग्राहकांनी सराफा बाजाराची वेस काही ओलांडली नाही. पण भाव कमी झाल्यावर ग्राहक खरेदीसाठी येत असल्याचे चित्र आहे.

4 / 6
इस्रायल - इराण युद्धबंदीच्या घोषणेने सोन्या आणि चांदीचे दर घसरल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे. युद्धानंतरचे धोरण निश्चित झाल्यानंतर आणखी घसरणीचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

5 / 6
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी सोन्याची किंमत जवळपास दोन आठवड्यांच्या निच्चांकावर आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदार चिंतेत सापडले. त्याचा परिणाम लागलीच सोन्याच्या मागणीवर दिसून आला.

6 / 6
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम

बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा