आता घर बसल्या होणार महत्त्वाची कामं, ‘या’ सुविधांचा मोबाईलवर घ्या लाभ

खासकरुन आधारशी संबंधित अनेक कामं तुम्ही घरबसल्या करु शकता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:46 PM, 25 Feb 2021
1/9
तुम्ही मोबाईलचा वापर फक्त बोलण्यासाठी किंवा चॅट करण्यासाठी करत असाल. पण तुमच्या मोबाईलद्वारे अनेक महत्वाची कामंही तुम्ही करु शकता. खासकरुन आधारशी संबंधित अनेक कामं तुम्ही घरबसल्या करु शकता.
2/9
यामध्ये ई आधार डाऊनलोड करणं, त्याचं स्टेटस अपडेट करणं किंवा आधार केंद्राचा पत्ता शोधणं असे अनेक कामं तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे करु शकता. इतकच नाही तर आधारशी संबंधित जवळपास 35 योजना आहेत ज्या तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे आरामात मिळवू शकता.
3/9
त्यासाठी यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने एम-आधार (mAadhar) मोबाईल App जारी केलं आहे. हे App तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता.
4/9
जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. अशावेळी हे mAadhar मोबाईल App डाऊनलोड करुन आधारशी संबंधित अनेक सुविधांचा लाभ तुम्ही घरबसल्या मिळवू शकता.
5/9
How can you open Aadhar card center know about income process and many other things
या Appचा अजून एक फायदा म्हणजे आधारची एक सॉफ्ट कॉपी कायमस्वरुपी तुमच्या जवळ असेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या आधारची हार्ड कॉपी कायम सोबत ठेवण्याची गरज उरणार नाही.
6/9
aadhaar and pan card bank accounts link aadhaar
विविध 12 भाषांमध्ये मोबाईल App - या Appसाठी भाषेची काही अडचण नाही. कारण देशातील विविध 12 भाषांमध्ये हे App उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. त्यात इंग्रजी भाषेचा समावेश तर आहेच.
7/9
सोबतच हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगु, आणि उर्दु भाषांचा समावेश आहे. हे App डॉऊनलोड केल्यानंतर यूजरला त्याच्या भाषेबद्दल विचारलं जाईल आणि त्यानंतर त्या भाषेत संपूर्ण काम केलं जाईल.
8/9
Appवर अनेक सुविधा - mAadhar या App द्वारे तुम्ही आधार कॉपी डाऊनलोड करणे, री-प्रिंटसाठी ऑर्डर करणे, ऑफलाई ई केवायसी डाऊनलोड, क्यूआर कोड दाखवणे किंवा स्कॅन करणे, आधारचं व्हेरिफिकेशन, मेल किंवा ईमेलचं व्हेरिफिकेशन, यूआयडी किंवा ईआयडी मिळवणे आणि एड्रेस व्हॅलिडेशन लेटरसाठी विनंती पाठवण्यासारख्या अनेक कामांचा त्यात समावेश आहे.
9/9
Post Office Aadhaar Updation Service
Post Office Aadhaar Updation Service