मुस्तफिजूर रहमानला IPL मधून काढण्याच्या BCCI च्या निर्णयाला महानआर्यमन सिंधिया यांचा पाठिंबा

Mahanaryaman Scindia : आयपीएलच्या केकेआर संघातील बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला स्पर्धेतून बाहेर काढण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. याला महानआर्यमन सिंधिया यांनी पाठिंबा दिला आहे.

| Updated on: Jan 04, 2026 | 9:14 PM
1 / 5
भारत-बांगलादेश यांच्यातील वाद उफाळलाय. त्यामुळे आयपीएलच्या केकेआर संघातील बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला स्पर्धेतून हटवण्याचे आदेश बीसीसीआयने केकेआरला दिले आहे.

2 / 5
मुस्तफिजूर रहमान आता आयपीएल मध्ये खेळताना दिसणार नाही. बीसीसीआयच्या निर्णयाचे मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांनी समर्थन केले.

3 / 5
एमपीसीएचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया त्यांच्या तीन दिवसांच्या ग्वाल्हेर-गुना दौऱ्यासाठी ग्वाल्हेर विमानतळावर पोहोचले. यावेळी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

4 / 5
महानआर्यमन सिंधिया म्हणाले की, 'बीसीसीआयने योग्य निर्णय घेतला आहे आणि देशासाठी हा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वजण बीसीसीआयशी सहमत आहोत.'

5 / 5
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन (MPCA) चे नेतृत्व आता एका तरुणाकडे आहे. अवघ्या २९ वर्षांच्या वयात, महानआर्यमान सिंधिया मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन (MPCA) चे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. ते ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील आहेत. त्यांचे वडील, ज्योतिरादित्य सिंधिया केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांचे आजोबा माधवराव सिंधिया यांनीही MPCA चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.