PHOTO Ind vs Eng: केवळ खराब बॅटिंगच नाही, तर विराट कोहलीते हे 5 निर्णयही पराभवाला कारणीभूत
या सामन्यात भारताच्या पराभवाला केवळ ढिसाळ फलंदाजी जबाबदार नाही, तर विराट कोहलीचे 5 निर्णयही कारणीभूत आहेत.

सामन्यात गोलंदाज वॉशिंगटन सुंदरचा चुकीचा उपयोग करण्यात आला. सुंदर धावसंख्या रोखण्यात यशस्वी ठरु शकला असता पण त्याला उशीरा 12 व्या षटकात गोलंदाजी देण्यात आली.
- इंग्लंडने अहमदाबादमध्ये झालेल्या टी-20 सामन्यात भारताला पराभवाची धूळ चारली. इंग्लंडने भारताचा 8 विकेटने पराभव केला. भारताची फलंदाजी ढिसाळ निघाल्याने केवळ 124 धावाच होऊ शकल्या. असं असलं तरी या सामन्यात भारताच्या पराभवाला केवळ ढिसाळ फलंदाजी जबाबदार नाही, तर विराट कोहलीचे 5 निर्णयही कारणीभूत आहेत.
- जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माला पहिल्याच सामन्यात विश्रांती देण्यात आली, हा पहिला चुकीचा निर्णय मानला जातोय.
- भारतीय संघाची निवड करतानाही उणीवा दिसल्या. एकाच वेळी संघात 3 फिरकीपटू खेळवण्यात आले, हा दुसरा चुकीचा निर्णय असल्याचं बोललं जातंय.
- दीपक चाहर सारख्या प्रतिभावान खेळाडूकडे दुर्लक्ष करत शार्दुल ठाकुरची निवड करणे. नवदीप सैनी हाही चांगला पर्याय होता. हा तिसरा चुकीचा निर्णय असल्याचं मत व्यक्त होतंय.
- विराट कोहलीने या सामन्यात गोलंदाजांचा जो क्रम निवडला तो चुकीचा असल्याचं जाणकारांचं मत आहे. यामुळेही नुकसान झाल्याचं मानलं जातंय.
- सामन्यात गोलंदाज वॉशिंगटन सुंदरचा चुकीचा उपयोग करण्यात आला. सुंदर धावसंख्या रोखण्यात यशस्वी ठरु शकला असता पण त्याला उशीरा 12 व्या षटकात गोलंदाजी देण्यात आली.






