PHOTOS : केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मुलीचे हे हटके फोटो पाहिलेत? बॉलिवुडमध्ये येण्याची जोरदार तयारी

सध्या केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी चांगलीच चर्चेत आहे. आरुषी निशंक (Arushi Nishank) असं तिचं नाव आहे.

1/9
सध्या केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी चांगलीच चर्चेत आहे. आरुषी निशंक (Arushi Nishank) असं तिचं नाव आहे. तिने म्युझिक व्हिडीओंमध्ये आपल्या अभिनयाची चूनक दाखवली आहे. लवकरच अभिनेत्री आरुषी निशंक बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. चला तर तिचे चाहत्यांना प्रेमात पाडणारे काही फोटो पाहुयात.
2/9
आरुषी निशंक फिटनेसबाबत खूप सजग आहे. तिचे योगासन आणि इतर व्यायाम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेत.
3/9
अभिनेत्री आरुषी निशंक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचीही सध्या चर्चा आहे.
4/9
आरुषी मागील काही दिवसांपासून आपल्या पदार्पणाच्या चित्रपटाचीच कसून तयारी करत असल्याचं सांगितलं जातंय.
5/9
काही रिपोर्टनुसार, अभिनेत्री आरुषीने आपल्या चित्रपटाची शुटिंग सुरुही केलीय. नुकतीच या चित्रपटाची काश्मीरमध्ये शुटिंग झालीय. त्याचे फोटो सोशल मीडियावरही दिसत आहेत.
6/9
आरुषी सामाजिक कार्यकर्ती देखील आहे. त्यासाठी तिचा अनेकदा सत्कारही झालाय. आरुषीला 'गंगा बचाओ अभियान'साठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
7/9
आरुषीचे फोटो कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
8/9
आरुषीने मेजर निराला नावाच्या एका चित्रपटाची निर्मातीही राहिलीय. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या चांगलीच आहे.
9/9
आरुषीच्या अनेक अदा तिच्या चाहत्यांना अक्षरशः घायळ करतात.