नव्या वर्षात 3 राशींना येणार अच्छे दिन! केतूच्या संक्रमणातून होतील मोठे फायदे
येणाऱ्या नव्या वर्षात जानेवारी महिन्याच्या अखेरीस नवग्रहांचा महत्वाचा भाग असलेला केतू ग्रह पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात संक्रमण करणार आहे. त्याचा शुभ परिणाम काही राशींवर दिसून येईल.

ketu sankraman effectImage Credit source: tv9 marathi
- नवग्रहाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून केतू ग्रहाकडे पहिलं जातं. या ग्रहाचा आपल्या जीवनावर वेळोवेळी शुभ – अशुभ प्रभाव पडत असतो. केतू हा प्रामुख्याने मोक्ष, अध्यात्म, अलिप्तता, अंतर्दृष्टी, तर्कशास्त्र, गूढवाद आणि ज्ञानाचा कारक मानला जातो, म्हणजेच तो जीवनाच्या या पैलूंचे प्रतिनिधित्व करतो.
- नवीन वर्षात म्हणजेच २०२६ मध्ये हा केतू ग्रह प्रथमच दि. २५ जानेवारी रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात संक्रमण करणार आहे. रविवारी सकाळी 7:09 वाजता हे संक्रमण होईल. या संक्रमणाचा शुभ परिणाम राशी चक्रातल्या 3 राशींवर होणार आहे. त्या 3 राशी कोणत्या ते आपण पाहूया.
- २५ जानेवारी २०२६ पासून होणाऱ्या केतुच्या संक्रमणाचा शुभ प्रभाव वृषभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर पडेल. या काळात व्यावसायिकांना पैसे कमविण्याच्या उत्तम संधी मिळतील. तर विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील. तुमचे प्रेम जीवन उत्तम राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्राधान्य द्याल. त्या बदल्यात तुम्हाला प्रेम मिळेल. मात्र या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल काहीशी काळजी घ्यावी लागू शकते.
- तूळ राशीच्या लोकांची मानसिक स्थिती केतूच्या संक्रमणाच्या शुभ प्रभावामुळे सुधारेल. तुम्ही भूतकाळातील गोष्टी विसरून एक नवीन सुरुवात कराल. तरुणांना करिअरमध्ये प्रगती होण्याची या काळात शक्यता आहे. घरातील कोणतेही वाद परस्पर संवादाद्वारे सोडवले जातील. त्याचबरोबर जुनी मालमत्ता किंवा गुंतवणूक मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देईल. आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुम्हाला खूप रस असेल.
- वृषभ आणि तूळ राशींव्यतिरिक्त, केतूचे संक्रमण कुंभ राशींनाही आनंद देईल. व्यावसायिकांच्या नवीन योजना यशस्वी होतील. नफा हळूहळू वाढेल. नोकरी करणाऱ्यांना कामावर कोणत्याही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. या काळात कुंभ राशीच्या नात्यांमध्येही प्रेम राहील. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





