AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी अमेरिकेहून आलं, कुणी घोड्यावर, तर कुणी गब्बर सिंगच्या वेषात…नवरदेवांचं आधी मतदान मगच लगीन

पंढरपूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदान क्रेंदावर मतदान करण्यास आलेल्या एक व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कारण ही व्यक्ती चक्क गब्बर सिंगच्या वेषात मतदान करायला आली होती. त्यांच्या या हटके लूकने सर्वांनाच कुतूहल वाटलं.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 02, 2025 | 5:27 PM
Share
 राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज, मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान होत असून मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  तसेच आजचा हा मतदानाचा हक्क कोणाही हातचा न जाऊ देण्याचा प्रयत्न केला आहे.

1 / 7
 ज्यांची लग्न होती ते नवरदेव-नवरीपासून अनेकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. तर एक नवरदेव तर थेट घोड्यावरून मतदान करायला आला होता. यावरून मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे याची कल्पना सर्वांना असल्याचं लक्षात येते

2 / 7
मनमाडमध्ये उमेदवार असलेल्या तरुणाचं आज लग्न आणि मतदान दोन्ही असल्यामुळे त्याची धावपळ झाली होती, मात्र त्याने दोन्ही गोष्टींचा मेळ बसवत मतदानाचा हक्क बजावला आहे.  या तरूणाचे नाव रोहन असून त्याची शिवसेने कडून उमेदवारी आहे.

3 / 7
नोकरीसाठी अमेरिकेत गेलेला तरूणाने भारतात येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अमेय सोमवंशी असं या तरूणाचं नाव असून गेल्या आठ वर्षांपासून तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियात वास्तव्याला आहे. बदलापूर नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे अमेय इथे आला आणि त्याने मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीत मतदानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच आपण मतदानासाठी भारतात आल्याचं अमेय यानं सांगितलंय.

4 / 7
वर्ध्यातही बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने मतदार केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.  अक्षय बहादूरकर असं नवरदेवाच नाव असून पुलगाव येथे नगर परिषद निवडणुकीसाठी नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला आहे.

वर्ध्यातही बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने मतदार केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. अक्षय बहादूरकर असं नवरदेवाच नाव असून पुलगाव येथे नगर परिषद निवडणुकीसाठी नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला आहे.

5 / 7
धाराशिवच्या तुळजापूरमध्ये नवरदेव घोड्यावर बसून थेट मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजवायला पोहोचला. लग्नाच्या आधी तुळजापूर येथील संकेत भोजनेनं मतदान केलं आहे.तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील बूथवर जाऊन त्याने आपला मतदानाचा हक्क आधी बजावला.

6 / 7
 पंढरपूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान झालं. तेव्हा प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, पण यावेळी तदान केंद्रावर मतदान करायला आलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. कारण या व्यक्तीने चक्क गब्बरसिंगच्या पोषाखात येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. दत्तात्रय सूर्यवंशी नावाच्या एका नागरिकाने मतदान करायला येताना शोले चित्रपटातील गब्बरसिंगचा लूक केला होता.

7 / 7
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?