रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ घटक आहारात घ्या…

टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते.

Apr 14, 2021 | 10:41 AM
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 14, 2021 | 10:41 AM

टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात.

1 / 6
रताळ्यात लोह, फोलेट, तांबे, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे असतात, जे तुमची रोगप्रतिकार शक्ती बळकट करतात. हे खाल्ल्याने तुमची त्वचा चमकदार होते. तसेच, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येत नाहीत. त्यामध्ये उपस्थित व्हिटामिन सी त्वचेमध्ये कोलेजेन तयार करतो, जे आपल्याला नेहमी तरुण आणि सुंदर दिसण्यात मदत करतात.

2 / 6
पेरु हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरु त्वचा, शरीर आणि केसांसाठी खूप चांगले आणि पौष्टिक फळ आहे. पेरू हा व्हिटॅमिन सीचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह देखील भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढायला मदत होते.

3 / 6
स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. ज्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांनी तर अगोदर आपल्या आहारात स्ट्रॉबेरी घेतली पाहिजे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपण कधीही स्ट्रॉबेरी खाऊ शकतो. अनेकांचा असा समज आहे की, स्ट्रॉबेरी खाल्ल्याने सर्दी खोकला येतो. मात्र, असे काही होत नाहीतर स्ट्रॉबेरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगली आहे. लहान मुले ज्येष्ठ नागरिक कोणीही स्ट्रॉबेरी खाऊ शकते.

4 / 6
ब्रोकोलीमध्ये लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कर्बोदके आणि क्रोमियम असतात. विशेष म्हणजे ब्रोकोली खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत देखील होते आणि सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात तर ब्रोकोली खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

5 / 6
उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांचा आहार सहसा संतुलित नसतो. ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. ही समस्या व्यवस्थापित करण्यासाठी दररोज पपईचे सेवन करा. यामुळे रक्तदाबाची समस्याही नियंत्रणात राहते. जे लोक दररोज पपई खातात त्यांना मधुमेहाची चिंता नसते. मासिक पाळीच्या अनियमिततेमुळे बर्‍याच स्त्रिया खूप त्रस्त असतात. महिला यासाठी विविध उपाययोजना करतात. बरेच जण औषधे देखील घेतात परंतु जर तुम्ही दररोज पपईचे सेवन केले तर हळूहळू या समस्येचे निराकरण होण्यास मदत होईल.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें